आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन लग्न होणार असल्याची या गायकाने पहिल्या पत्नीला दिली होती कल्पना, तिला वाटली थट्टा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन मेहमुद यांचा गायक मुलगा लकी अली गेल्या अनेक वर्षांपासून लाईमलाईटमध्ये नाही. सध्या लकी अलीचे तिसरी पत्नी आएशासोबतचे काही फोटो समोर आले आहेत. आएशाचे खरे नाव केट एलिझाबेथ हलाम आहे. आएशा लकी अलीपेक्षा जवळपास 24 वर्षांनी लहान आहे. आएशाने मिस ग्रेट ब्रिटन हा खिताबही जिंकलेला आहे. दोघांनी 2010 साली लग्न केले होते. दोघांना एक 6 वर्षाचा मुलगा आहे. बंगळुरुचा गिटार बँडची सदस्य आहे आएशा..
 
आएशाने नुकतेच बंगळुरुचा एक बँड Barberians जॉईन केला आहे. आएशा मॉडेल, गिटार प्लेअर आणि अभिनेत्रीही आहे. लग्नानंतरही आएशा मॉडेलिंग करत आहे आणि  लकीसोबत मुंबईतच राहते. 
 
58 वर्षीय लकीने तीन लग्न केले आहेत. त्याची पहिली पत्नी मेघन जेन मकक्लियरी होती. मेघनने लकीच्या 'सुनो'मध्ये काम केले होते. मेघनपासून लकीला दोन मुले आहेत. पण काही वेळानंतर दोघे वेगळे झाले. लकीने मग दुसरे लग्न इनायासोबत केले. इनाया आणि लकीला दोन मुले आहेत. इनायासोबत घटस्फोट झाल्यानंतर लकीने 2010 साली 52 वर्षाचा असताना ब्रिटिश ब्यूटी क्वीन केट एलिजाबेथसोबत लग्न केले. लग्नानंतर केटने तिचे नाव बदलले आणि आएशा ठेवले. एका मुलाखतीत लकीने त्याच्या पहिल्या पत्नीला त्याचे तीन लग्न होतील असे सांगितले होते पण त्याच्या पत्नीला ती थट्टा वाटली होती. पण नंतर झालेही असेच..
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, लकी अलीच्या तिन्ही पत्नींचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...