आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील मुस्लिम, आई हिंदू आणि ख्रिश्चन, कुटुंबाला 'मिनी इंडिया' म्हणतो सलमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेच्या (intolerance) मुद्यावर अभिनेता शाहरुख खानने केलेल्या वक्तव्यावर जेव्हा सलमान खानला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'मला फक्त एवढे माहित आहे की माझ्या आईचे नाव सुशीला चरक आहे आणि वडिल सलीम खान आहेत.' सलमान खानची आई सलमा खान यांचे खरे नाव सुशीला चरक आहे.
उल्लेखनीय बाब महणजे, सलमान खानचे आईवडीलच नव्हे तर बहीण-भावंडांनीसुद्धा वेगवेगळ्या धर्मातील लोकांसोबत लग्न केले आहे. म्हणून सलमान आपल्या कुटुंबाला मिनी इंडिया म्हणतो. त्याच्या कुटुंबात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचे लोक एका छताखाली गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्याचे वडील मुस्लिम तर आई हिदू आहे. तर दुसरी आई हेलन या ख्रिश्चन आहेत. धाकटा भाऊ अरबाज खानची पत्नी मलायका आणि सोहेल खानची पत्नी सीमा या पंजाबी आहेत.
एप्रिल महिन्यात स्वतःला म्हटले होते 'भारतीय'
याचवर्षी एप्रिल महिन्यात जोधपूर कोर्टात सलमानने आपला धर्म भारतीय सांगतला होता. काळवीटाची शिकार आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीत कोर्टाने सलमानला त्याचा धर्म विचारण्यात आला. त्यावर सलामानने उत्तर दिले, 'मी भारतीय आहे'. कोर्ट म्हणाले, 'देशातील प्रत्येक नागरिक भारतीय असतो. तुझी नेमकी जात कोणती' असा प्रतिप्रश्न केला. त्यावर सलमान म्हणाला, 'माझी आई हिंदू तर वडील मुसलमान आहे. त्यामुळे माझा धर्म आणि जात 'भारतीय'च असल्याचे मी मानतो.'
1964 साली झाले होते सलीम आणि सुशीला यांचे लग्न
सलमानचे वडील सलीम खान हे प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर आहेत. 1964 मध्ये त्यांनी सुशील चरक यांच्यासोबत लग्न केले. सुशीला यांचा जन्म मराठी हिंदू कुटुंबात झाला. लग्नाच्या वेळी सुशीला यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करुन स्वतःचे नाव सलमा असे ठेवले. त्या सलीम खान यांच्या पहिल्या पत्नी आहेत. अभिनेत्री हेलन यांच्यासोबत सलीम खान यांनी दुसरे लग्न केले. हेलन या ख्रिश्चन आहेत.
वडीलच नव्हे तर सलमानच्या धाकट्या बहीणभावंडांनी दुस-या धर्माच्या लोकांशी लग्न केले आहे. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या कोणत्या फॅमिली मेंबरने कोणत्या धर्मात लग्न केले....
बातम्या आणखी आहेत...