आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी टाऊनच्या अॅक्ट्रेसेसना मात देऊ शकते मिथून दांची लाडकी लेक, तान्ही असतानाच घेतले दत्तक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये 'डिस्को डान्सर'च्या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आज वयाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत. मिथून चक्रवर्ती यांचे लग्न अभिनेत्री योगिता बाली यांच्यासोबत झाले आहे. या दाम्पत्याला तीन मुले आणि एक मुलगी असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. महाक्षय, रिमोह आणि नमाशी चक्रवर्ती ही त्यांच्या मुलांची तर दिशानी चक्रवर्ती हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. मिथूनदांची ही लाडकी लेक आता मोठी झाली असून सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव आहे. 
 
दिशानी आहे मिथून दांची दत्तक घेतलेली मुलगी...
दिशानी ही मिथून दांची दत्तक मुलगी असल्याचे तुम्हाला माहित आहे का... दिशानी अगदी तान्ही असताना कोलकाता शहराबाहेरील एका कचराकुंडीत सापडल्याचे म्हटले जाते. तिलाच मिथून दांनी दत्तक घेऊन आपले नाव दिले. इतकेच नाही तर तीन मुलांइतकाच संपत्तीत वाटा दिल्याचेही म्हटले जाते.
 
आईवडिलांच्या पावलावर ठेवणार पाऊल...
दिशानी नेहमीच आपल्या वडील आणि थोरल्या भावांसोबत पेज थ्री पार्टीजमध्ये दिसत असते. सेलिब्रिटी डॉटर असल्याने दिशानी इतर स्टार किड्सप्रमाणेच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. ती लेटेस्ट फॅशन फॉलो करताना दिसते. ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा दिशानी कुठेच मागे नाही. भविष्यात आपल्या आईवडील आणि भावाच्या पावलावर पाऊल ठेवत दिशानीसुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करेल, असे म्हणता येईल. त्यासाठी न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीत ती अॅक्टिंगचे धडेदेखील गिरवत आहे. दिशानी इंस्टाग्रामवर बरीच अॅक्टिव असून आपले लेटेस्ट फोटोज ती नित्यनेमाने शेअर करत असते.
 
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला दिशानीने इंस्टाग्राम शेअर केलेले तिचे खास फोटोज दाखवत आहोत. पुढे क्लिक करुन पाहा, किती स्टायलिश आहे मिथून दांची ही लाडकी लेक... 
बातम्या आणखी आहेत...