आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Mithun Chakraborty\'s Daughter Dishani Chakraborty

भेटा मिथूनदांच्या लाडक्या लेकीला, तान्ही असतानाच घेतंलय दत्तक, सापडली होती कचरा कुंडीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः
अभिनेता मिथून चक्रवर्ती यांना तीन मुले आणि एक मुलगी असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. महाक्षय, रिमोह आणि नमाशी चक्रवर्ती ही त्यांच्या मुलांची तर दिशानी चक्रवर्ती हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. मिथून दांची ही लाडकी लेक आता मोठी झाली असून सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. मात्र दिशानी ही मिथून दांची दत्तक मुलगी असल्याचे तुम्हाला माहित आहे का... दिशानी अगदी तान्ही असताना कोलकाता शहराबाहेरील एका कचराकुंडीत सापडल्याचे म्हटले जाते. तिलाच मिथून दांनी दत्तक घेऊन आपले नाव दिले. इतकेच नाही तर तीन मुलांइतकाच संपत्तीत वाटा दिल्याचेही म्हटले जाते.
दिशानी नेहमीच आपल्या वडील आणि थोरल्या भावांसोबत पेज थ्री पार्टीजमध्ये दिसत असते. सेलिब्रिटी डॉटर असल्याने दिशानी इतर स्टार किड्सप्रमाणेच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. ती लेटेस्ट फॅशन फॉलो करताना दिसते. भविष्यात आपल्या आईवडील आणि भावाच्या पावलावर पाऊल ठेवत दिशानीसुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करेल, असे म्हणता येईल.
इंस्टाग्रामवर दिशानी बरीच अॅक्टिव असून आपले लेटेस्ट फोटोज ती नित्यनेमाने शेअर करत असते.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाल दिशानीने इंस्टाग्राम शेअर केलेले तिचे खास फोटोज दाखवत आहोत. पुढे क्लिक करुन पाहा, किती स्टायलिश आहे मिथून दांची ही लाडकी लेक...