आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Meet Najeem Khan, Who Played Salman Khan Younger Version Of Salman Khan In Bajrangi Bhaijaan

हा आहे सलमान खानचा डुप्लिकेट, \'बजरंगी भाईजान\'मध्ये एकत्र केलेय काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोत अभिनेता सलमान खानसोबत त्याच्यासारखाच हुबेहुब दिसणारा नजीम खान)
मुंबई- सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'बजरंगी भाईजान' सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमात सलमानच्या तारुण्यातील भूमिका त्याचा डुप्लिकेट नजीम खानने साकारली आहे. आफगाणिस्तानचा रहिवासी नजीम खान सध्या दिल्लीमध्ये राहत आहे. मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर करण्याची तयारी करत आहे. 'बजरंगी भाईजान' त्याचा पहिला सिनेमा आहे.
सलमान खानचा हमशक्ल असल्याचे कधी वाटले?
नजीमने divyamarathi.comला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते, की त्याला कधी सलमान खानचा हमशक्ल असल्याचे जाणावले. नजीम म्हणाला, 'जेव्हा मी 6-7 वर्षांचा होतो, तेव्हापासून जिममध्ये जाण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी मी बॉडी बिल्डिंग करण्यास सुरु केले. माझे मस्कुलर तयार झाल्यानंतर माझे कुटुंबीय आणि मित्र परिवात मला म्हणायला लागले, की मी सलमानसारखा दिसतोय. 19व्या वर्षी मी स्वत:ला सतत आरशासमोर उभा राहून पाहायचो आणि माल मिळणा-या कॉम्प्लीमेंट्सविषयी विचार करू लागलो. तेव्हा मी सलमानसारखा लुक करण्यासाठी त्याची स्टाइल स्वीकारली. जेव्हा मी सलमानसारखे कपडे घालून हेअरस्टाइल करून स्वत:ला आरशात पाहिले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी खरंच सलमानसारखा दिसायला लागलो होतो. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही.'
नजीमने सलमान खानसारखे होण्यासाठी काय-काय केले हेदेखील सांगितले. नजीमच्या सांगण्यानुसार, 'दररोज वर्कआऊट केल्याने माझी बॉडी पूर्वीच तयार झालेली होती. स्वत:ला सलमानसारखे करण्यासाठी मी त्याचे अनेक सिनेमे पाहिले. मी सलमानच्या लाइफस्टाइलला फॉलो करण्यासाठी त्याच्यासारखे कपडे, जसे स्क्रिनवर घालतो तसे. अॅक्सेसरीज जे ऑनस्क्रिन घालतो, जसे एअरिंग्स, घड्याळ, लॉकेट्ससारख्या वस्तूंची खूप शॉपिंग केली. माझ्याकडे बीइंग ह्यूमनच्या कपड्यांचे मोठे कलेक्शन आहे. सलमान घालतो तसे ब्रासलेट्ससुध्दा माझ्याकडे आहे. परंतु मी ते नेहमी नाही घालत. माझ्या मते, ब्रासलेट्स सलमानसाठी भावनिक वस्तू आहे आणि मला त्याला एवढेही कॉपी करायचे नाहीये.'
अशी झाली सलमानची भेट-
नजीमने सलमानच्या पहिली भेटविषयी divyamarathi.comला सांगितले होते, 'सलमान बॉडीगार्ड सिनेमाचे शूटिंग करत होता, त्यावेळी फेसबुकवर एक कॉन्टेस्ट चालू होते. फेसबुकवर आपल्याला आपले फोटो पोस्ट करायचे होते. ज्याच्या फोटोला सर्वाधिक लाइक्स मिळतील त्याला सलमानला भेटण्याची संधी मिळणार होती. मी ही स्पर्ध जिंकली. मात्र मला सलमानला भेटण्यासाठी 6 महिने वाट पाहावी लागली. अखेर तो दिवस आला आणि मी सलमानला भेटलो. मी केवळ 30 सेकंदांसाठी सलमानला भेटलो. परंतु मी सलमानला भेटून त्याच्यासोबत फोटो काढून त्याचा ऑटोग्राफ घेऊन खूप आनंदी होतो.'
अशी झाली 'बजरंगी भाईजान'साठी निवड-
नजीमच्या सांगण्यानुसार, 'माझा कास्टिंग एजेंट एक प्रोजेक्ट घेऊन आला आणि जेव्हा मी ऐकले, की मला सलमानच्या तारुण्यातील भूमिका साकारण्याची संधी मिळतेय, माझ्या आनंदाचा पारावार उरला नाही. मला मानधनाची चिंता नव्हती. मला फक्त सलमानसोबत काम करण्याची इच्छा होती. सर्व फायनल झाल्यानंतर निर्मात्यांनी मला हेअरस्टाइल आणि कपडे देऊन सलमानचा लूक दिला. जेणेकरून मी त्याच्यासारखा हूबेहूब दिसू शकेल.' नजीमने असेही सांगितले, की सलमानला भेटल्यानंतर त्याने नजीमला अलिंगन दिले. नजीमने सांगितले, 'मी सलमानला शूटिंगच्या दुस-या दिवशी भेटलो. कबीर खानने मला त्याच्याशी भेटण्याची संधी दिली. त्याने एक स्माइल दिली आणि माझ्या टी-शर्टवर एक साइन केली. मी त्याला फेसबुक कॉन्टेस्टचा फोटो दाखवला आणि त्याने माझी गळाभेट घेतली. सलमानसोबत जो वेळ घालवला, त्याने जे प्रेम दिले ते मी कधीच विसरू शकणार नाही.'
'तेरे नाम'पासून जागृत झाली सलमान प्रति दीवानगी-
नजीमने सांगितले होते, 'मी लहान असताना, हृतिक रोशन, अर्जुन रामपाल, शाहरुख खान आणि सलमान खानला पसंत करत होतो. परंतु 'तेरे नाम' सिनेमा पहिल्यानंतर सलमान खानचा मोठा चाहता झालो. परंतु 'वॉन्टेड' पाहिल्यानंतर तर मी त्याचा दीवानाच झालो.'
नजीम खानच्या रुपात लोकांनी ओळखावे-
नजीम खानची इच्छा आहे, की लोकांनी त्याला त्याच्या मूळ नावाने ओळखावे. याविषयी त्याने सांगितले, 'मला वाटते, की लोकांनी मला नजीम खान नावाने ओळखावे. मी सलमानचा आभारी आहे, कारण त्याच्यामुळे मला डेब्यू प्रोजेक्ट मिळाला. परंतु यानंतर मी असे प्रोजेक्ट्स साइन करण्याचा प्रयत्न करेल, जे मला सलमानचा डुप्लिकेट्स म्हणून नव्हे नजीम खान म्हणून मिळतील. मी सलमान खूप आदर करतो. तो त्याच्या पर्सनॅलिटीसाठी योग्य, त्याला कुणीच कॉपी करू शकत नाही. तो एक समुद्र असून मी एक थेंब आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानचा हमशक्ल नजीम खानचे काही PHOTOS...