आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकट्या मिलिंदच नव्हे तर मकरंदची गर्लफ्रेंडसुद्धा आहे बरीच लहान, दोघांमध्ये आहे 20 वर्षांचे अंतर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपल्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या मुलीला डेट करत असल्याने अभिनेता मिलिंद सोमण चर्चेत आहे. अंकिता कोनवारसोबत हे मिलिंदच्या गर्लफ्रेंडचे नाव असून सध्या हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या वयात तब्बल 33 वर्षांचे अंतर आहे. मिलिंद 51 वर्षांचा तर अंकिता ही 18 वर्षांची आहे. स्वतःपेक्षा लहान मुलीसोबत डेटिंग करणारा मिलिंद एकटा अभिनेता नाहीये. मकरंद देशपांडेच्या नावाचासुद्धा या यादीत उल्लेख होतो. 

 

स्वतःपेक्षा 20 वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात पडला मकरंद...  
प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. रंगभूमीवर रमणा-या मकरंद यांनी हिंदीसह अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. 6 मार्च 1966 रोजी जन्मलेल्या मकरंद यांनी वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. दोन नावाजलेल्या अभिनेत्रींसोबत ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यापैकी एक म्हणजे शशी कपूर यांची कन्या संजना कपूर आणि दुसरी अभिनेत्री म्हणजे 'दिल चाहता है' फेम सोनाली कुलकर्णी. सोनालीसोबत तर मकरंद जवळजवळ चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, असे म्हटले जाते. या दोघांचे प्रेम संबंध संपुष्टात आल्यानंतर त्यांनी प्रोफेशनल रिलेशन मात्र जपले.

 

वयाची 51 वर्षे पूर्ण करणारे मकरंद यांच्या आयुष्यात निवेदिता पोहनकर या तरुणीचे आगमन झाले आहे. निवेदिता आणि मकरंद यांच्या वयात तब्बल 20 वर्षांचे अंतर आहे. 2015 साली हे दोघे लग्न करणार असल्याचे वृत्त आले होते. या दोघांचे लग्न झाले की नाही हे अद्याप उघड झालेले नाही. पण ठिकठिकाणी हे दोघे एकत्र दिसत असतात. अलीकडेच निवेदिताने मकरंदसोबतचा एक सेल्फी शेअर करुन 'घरात चुकीला माफी नाही...' असे कॅप्शन फोटोला दिले होते. यावरुन दोघे बहुदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असावे असा अंदाज व्यक्त केला जातोय. 

 

निवेदिता कोण आहे, तिची पार्श्वभूमी काय... जाणून घेऊयात... 
निवेदिता पोहनकर हे नाव अद्याप सिनेसृष्टीला तसे नवीनच आहे. निवेदिता एक लेखिका असून पृथ्वी थिएटरशी जुळलेली आहे. रंगभूमीवर काम करत असतानाचा निवेदिता आणि मकरंद यांची भेट झाल्याचे म्हटले जाते. निवेदिताविषयी आणखी सांगायचे म्हणजे ती मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती पोहनकर हिची धाकटी बहीण आहे. अदितीला आपण रितेश देशमुख स्टारर लय भारी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर बघितले आहे. अदिती पोहनकर आता 27 वर्षांची आहे. त्यामुळे साहजिकच निवेदिता आता विशीतील तरुणी आहे. यावरुन मकरंद आणि निवेदिता यांच्यात जवळजवळ 20 वर्षांचे अंतर असल्याचे म्हटले जात आहे. 

 

निवेदिता स्पोर्ट्स आणि संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आहे. तिची आई शोभा पोहनकर या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी प्लेअर तर वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पिअन आहेत. तर काका पंडीत अजय पोहनकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत.  मकरंद आणि निवेदिता यांच्या भेटीला सात ते आठ वर्षे झाली आहेत.

 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मकरंद आणि निवेदिताची खासगी आयुष्यातील छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...