आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणी दिसते वयस्कर तर कुणी आहेत ठेंगणे, भेटा बॉलिवूडच्या \'ODD कपल्स\'ना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 2003मध्ये आलेल्या 'मातृभूमि' सिनेमात कल्कि बनून अभिनेत्री ट्यूलिप जोशीने पांच भावांसोबत लग्न केले होते. त्याच ट्यूलिपने शुक्रवारी (11 सप्टेंबर) 36वा वाढदिवस साजरा केला. क्वचितच लोकांना माहित आहे, की ट्यूलिपचे लग्न साधे सरळ दिसणारे कॅप्टन विनोद नायरसोबत झाले आहे. कॅप्टन नायरविषयी काही खास माहिती उपलब्ध नाहीये. मीडियी रिपोर्ट्सनुसार, ते एटिकेट एक्सपर्ट आहेत. नायर हाइटमध्येसुध्दा ट्यूलिपपेक्षा लहान दिसतात आणि मीडियापासून दूर राहतात. मात्र अनेक निमित्तावर त्यांनी आपल्या अभिनेत्री पत्नीसोबत कॅमे-यासमोर पोज देताना दिसतात. जाणून घेऊया ट्यूलिपविषयी आणखी काही माहिती...
गुजराती वडील आणि अरमेनिअन आईची मुलगी-
ट्यूलिपचा जन्म 11 सप्टेंबर 1979ला मुंबई, महाराष्ट्रात झाला. तिचे वडील गुजराती आणि आई अरमेनिअन आहेत. मुंबईच्या जमनाबाई नरसी शाळेतून त्यांनी शालेय आणि विवेक कॉलेजमधून मजोरिंग फूड सायन्स अँड केमिस्ट्रीमध्ये पदवी शिक्षण घेतले. 2000मध्ये त्यांनी फेमिना मिस इंडिया स्पर्धेतसुध्दा सहभाग घेतला होता. परंतु विजेत्यांमध्ये स्थान मिळवू शकली नाही. मात्र त्यानंतर तिने पाँड्स, सियाराम्स, पेप्सी आणि बीपीएलसारख्या अनेक प्रसिध्द ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या.
बॉलिवूडमध्ये एंट्री-
ट्यूलिपने 2002मध्ये आलेल्या 'मेरे यार की शादी है' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. निर्माता आदित्य चोप्रा आपल्या एका मित्रा लग्नात गेले होते, तिथे त्यांना ट्यूलिप दिसली. त्याचवेळी आदित्य यांनी ट्यूलिपला 'मेरे यार की शादी है' सिनेमाच्या ऑडिशनची ऑफर दिले. मात्र त्यावेळी ट्यूलिपला स्पष्ट हिंदी बोलता येत नव्हती. सांगितले जाते, की त्यासाठी तिला फिरोज खान स्टुडिओमध्ये हिंदीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. 2003मध्ये तिने तेलगूच्या 'व्हिलेन' आणि 'हिंदी'मध्ये 'मातृभूमि' सिनेमात काम केले.
'मातृभूमि' बॉक्स ऑफिसवर हिट होऊ शकला नाही, मात्र सिनेमातील तिच्या भूमिकेने खूप प्रशंसा मिळवली. 'मातृभूमि' भ्रूण हत्येवर आधारित सिनेमा होता. त्यामध्ये भविष्यातील मुलांच्या संख्येची कमतरता दाखवण्यात आली होती. भ्रूणहत्या झाल्यात भविष्यात लग्नासाठीसुध्दा मुली मिळणार नाहीत, असे दाखवण्यात आले होते. सिनेमात ट्यूलिपने कल्किचे पात्र साकारले होते. ती भावांसोबत लग्न करते आणि तिला दर आठवड्यातील प्रत्येक रात्र सर्व भावांसोबत घालावी लागते. इतके नव्हे तर लग्नाच्या पहिल्यात रात्री तिला सास-यासोबतसुध्दा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सांगितले जाते.
बॉलिवू़डच्या निवडक सिनेमांत ट्यूलिपने केले काम-
'दिल मांगे मोर' (2004), 'शून्य' (2006), 'धोखा'(2007), 'कभी कही' (2007), 'सुपरस्टार' (2008), 'डॅडी कूल'(2009), 'रनवे' (2009), 'होस्टल' (2010) आणि 'बी केअरफुल' (2011)सारखे काही बॉलिवूड सिनेमांत ट्यूलिपने काम केले आहे. शिवाय तेलगू, पंजाबी आणि कन्नडी भाषांच्या सिनेमातसुध्दा ट्यूलिप दिसली आहे.
ज्याप्रकारे ट्यूलिप आणि नायरची जोडी ODD वाटते, तशीच काहीशी परिस्थिती बॉलिवूडमध्ये अनेक कपल्सचीसुध्दा आहे.
divyamarathi.com आज तुम्हाला अशाच काही जोड्यांविषयी सांगत आहे, जाणून घेण्यासाठी स्लाइड्सवर क्लिक करा...