आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे गुलशन कुमार यांची मुलगी, वडिलांच्या निधनानंतर आली सिंगिंग करिअरमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध गायक आणि टी-सीरिज कंपनीचे मालक दिवंगत गुलशन कुमार यांची मुलगी तुलसी कुमार हिने याचवर्षी मे महिन्यात तिच्या सासूबाई अंजू यांच्यासाठी जयपूरमध्ये एक सरप्राइज बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत फॅमिली मेंबर्ससोबत काही निवडक फ्रेंड्स सहभागी झाले होते. 22 फेब्रुवारी 2015 रोजी जयपूरचे बिझनेसमन हितेश रल्हानसोबत तुलसीचे लग्न झाले आहे. तुलसी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. 2006 साली आलेल्या 'चुप चुपके' या सिनेमातील 'शब ए फिराक' या गाण्याद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
पिंक सिटीसोबत आहे तुलसीचे खास कनेक्शन..
- तुलसीचे पती हितेश जयपूरमधील एक मोठे बिझनेसमन आहेत. येथे त्यांचा गारमेंट आणि फर्निचर एक्सपोर्टचा बिझनेस आहे.
- हितेश आणि तुलसीची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती.
- 2014 मध्ये दोन्ही कुटुंबीयांच्या परवानगीने दोघांनी साखरपुडा केला आणि 2015 मध्ये दोघे बोहल्यावर चढले.

अशी आहे तुलसी कुमारची फॅमिली...
- वडील गुलशन कुमार यांच्या मृत्यूनंतर तुलसीचा भाऊ भूषण कुमार यांनी टी-सीरिजची धुरा सांभाळली. तर तुलसीने सिंगिंगमध्ये करिअर केले.
- टी-सीरिजची गणना भारतातील सर्वात मोठ्या म्युझिक कंपनीत होते. आता ही 200 मिलियन डॉलर अर्थातच सुमारे 1300 कोटींची कंपनी बनली आहे.
- तुलसीची बहीण खुशाली कुमार एक मॉडेल आणि डिझायनर आहे.
- वयाच्या सहाव्या वर्षीपासून तुलसीने सुरेश वाडकर अॅके़डमीत गायनाचे धडे गिरवले.
- गुलशन कुमार यांचा मुलगा आणि निर्माता भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला तुलसीची वहिनी आहे.

दिल्लीत झाले तुलसीचे शिक्षण...
- तुलसीने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून पूर्ण केले.
- तिने 'चुप-चुप के' सिनेमातून बॉलिवूडमध्ये सिंगिंग डेब्यू केले. त्यानंतर हमको दीवाना कर गए आणि अक्सर या सिनेमांसाठी गाणी गायली.
- 'आशिकी 2', 'सिंघम रिटर्न', 'एअरलिफ्ट' आणि 'सनम रे', यारियां या सिनेमांसाठीही तिने स्वरसाज चढवला आहे.
- तुलसी कुमारने संगीतकार हिमेश रेशमिया, प्रीतम आणि साजिद-वाजिद यांच्यासोबत काम केले आहे.

तुलसीने स्वरबद्ध केलेली गाणी...
- मोहब्बत की गुजारिश... (अक्सर)
- हमको दीवाना कर गए... (हमको दीवाना कर गए)
- तेरी याद बिछाके सोता हूं... (रॉकी)
- तेरे बिन चैन न आवे... (कर्ज)
- तुम जो आए जिंदगी में बात बन गई... (वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई)
- तू ही रब तू ही दुआ... (डेंजरस इश्क)
- सांसों ने बांधी है डोर पिया... (दबंग-2)
- मेरे यारा तेरे गम अगर पाएंगे... (आशिकी-2)
- मुझे इश्क से... (यारियां)
- कुछ तो हुआ है... (सिंघम रिटर्न)
- तू है कि नहीं... (रॉय)
- सोच ना सके... (एअरलिफ्ट)
- इश्क दी लत तड़पावे... (जुनूनियत)

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, तुलसी कुमार आणि तिच्या कुटुंबीयांचे निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...