आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे रणबीर कपूरची पाकिस्तानी चाहती, आता बॉलिवूडमध्ये करणार एंट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- रणबीर कपूर आणि मावरा हॉकेन)
मुंबई- पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री मावरा हॉकेन रणबीर कपूरची खूप मोठी चाहती आहे. बातमी आहे, की रणबीरच्या एका व्हिडिओमुळे मारवाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाची संधी मिळाली आहे. एप्रिलमध्ये रणबीरने मारवाच्या नावाने सोशल साइटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये तो तिला फ्लाइंग Kiss करताना म्हणाला होता, 'हाय! मारवा, मै रणबीर कपूर...तू खूप सुंदर आणि हुशार आहेस. आशा आहे, की आपली लवकरच भेट होईल.'
या व्हिडिओनंतर मारवा अनेक दिवस चर्चेत आली होती. तिची वाढत्या लोकप्रियतेने तिला बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची संधी मिळाली. सध्या याच निमित्त ती मुंबईमध्ये आली आहे. मात्र, अद्याप सिनेमाचे नाव दिग्दर्शक आणि इतर स्टारकास्टाचा खुलासा झालेला नाहीये.
2012मध्ये पाकिस्तानी टीव्हीवर पदार्पण-
22 वर्षीय मावराचा जन्म 28 सप्टेंबर 1992 रोजी कराची, पाकिस्तान येथे झाला. ती पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री उर्वा हॉकेनची धाकटी बहीण आहे. 2012मध्ये 'मेरे हुजूर' मालिकेतून तिने पाक टीव्हीवर पदार्पण केले आणि 2013 मध्ये हम टीव्हीची उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नॉमिनेट झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मावराचे ग्लॅमरस फोटो...