आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी ऑस्ट्रेलियात टॅक्सी चालवायचा हा अभिनेता, भेटा त्याच्या कुटुंबीयांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक (हरियाणा) : अभिनेता रणदीप हुड्डाचा 'लाल रंग' सिनेमा येत्या 22 एप्रिलला रिलीज होणार आहे. अलीकडेच तो फाजिलपूरियासोबत या सिनेमातील एका गाण्याचे शूटिंग करताना गुडगावमध्ये दिसला होता. रोहतकमध्ये जन्मलेला रणदीपचे फॅमिली बॅकग्राऊंड सिनेसृष्टीपासून खूप वेगळे आहे. कधीकाळी रणदीपने अभिनेता होऊ नये अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती.
रणदीपला काय व्हायचे होते...?
- रणदीपने शालेय शिक्षण सोनीपतच्या मोतीलाल नेहरू स्पोर्ट्स स्कूलमधून घेतले.
- त्याला शाळेपासूनच स्विमिंग, हॉर्स रायडिंग आणि पोलोसारख्या खेळांमध्ये रुची होती.
- त्याने शाळेत असताना स्कूल प्रॉडक्शन आणि थिएटर जॉइन केले होते.
- एका मुलाखतीत रणदीपने सांगितले होते, की मी डॉक्टर व्हावे अशी कुटुंबीयांची इच्छा होती.
- चांगले शिक्षण मिळावे म्हणून रणदीपला दिल्लीच्या डीपीएसमध्ये टाकले.
- रणदीपला डॉक्टर व्हायचे नव्हते. म्हणून तो पुढील शिक्षणासाठी मेलबर्नला गेला आणि तिथूनच मार्केंटिंगमध्ये पदवी घेतली.
- त्यासोबतच त्याने थिएटर आणि अभिनयास सुरुवात केली आणि त्याची रुची वाढत गेली. ़
- मेलबर्नहून परत आल्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.
ऑस्ट्रेलियामध्ये चालवत होता टॅक्सी...
- रणदीपने एका मुलाखतीत सांगितले होते, की तो ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेताना टॅक्सी चालवत होता.
- त्याने सांगितले, की पैशांची चणचण भासत असल्याचे त्याला टॅक्सी चालवावी लागत होती. तरीदेखील पैसे पूरत नव्हते.
- इतकेच नव्हे पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी त्याचे चाइनीज रेस्तरॉमध्येसुध्दा काम केले आणि लोकांच्या कारसुध्दा धुतल्या.
असे आहे रणदीपचे फॅमिली बॅकग्राऊंड...
- रणदीप हुड्डाचा जन्म हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात झाला आणि तो जाट कम्युनिटीमधून आहे.
- त्याची आई आशा हुड्डा भाजप नेता आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. तसेच वडील रणबीर हुड्डा सर्जन आहे.
- त्याची थोरली बहीण अंजली हुड्डा डॉक्टर असून तिला दोन मुले आहेत.
- रणदीपचा धाकटा भाऊ संदीप हुड्डा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो सिंगापूरमध्ये राहतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून भेटा रणदीप हुड्डाच्या फॅमिली मेंबर्सना...