आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी आयुष्यातसुद्धा बॉक्सर आहे 'साला खडूस'ची अॅक्ट्रेस, पाहा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितिका सिंह - Divya Marathi
रितिका सिंह
मुंबईः या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या आर. माधवन स्टारर 'साला खडूस'' या सिनेमात रितिका सिंहने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. सिनेमात लेडी बॉक्सरची भूमिका वठवणारी रितिका खासगी आयुष्यातसुद्धा एक बॉक्स आहे. शिवाय ती मार्शल आर्टमध्येही ट्रेंड आहे.
बॉक्सिंगमुळे मिळाला सिनेमा
रितिकाला 'साला खडूस' हा सिनेमा मिळण्यामागे एक रंजक कहाणी आहे. ख-या आयुष्यात बाक्सिंग फिल्डमध्ये असलेल्या तरुणीच्या शोधात फिल्ममेकर्स होते. त्यामुळे त्यांनी 22 वर्षीय रितिकाची निवड केली.
रितिकासाठी अभिनय करणे होते एक आव्हान
रितिकाच्या मते, बॉक्सिंग हा जेवढा कठीण खेळ आहे, तितकेच कठीण अभिनय करणे आहे. आपण सिनेमा बघताना केवळ त्याची मजा घेत असतो. मात्र त्यामागे किती कठोर मेहनत आहे, याचा अंदाज आपल्याला नसतो. आपल्याला एखादा सिनेमा बघताना त्यातील कलाकारांचा अभिनय खूप सोपा वाटतो. मात्र प्रत्यक्षात त्यामागे असलेली मेहनत प्रेक्षक बघू शकत नाहीत. बॉक्सिंग रिंगमध्ये लोक आम्हाला खेळताना बघताना, मात्र त्यामागे आम्ही घेत असलेली मेहनत कुणालाही दिसत नाही.
मॅडी सरांनी शिकवला मेकअप
रितिकाने सांगितले, की सिनेमातील तिचा सहकलाकार आर. माधवनने तिला मेकअप कसा करायचा ते शिकवले. ती म्हणते, ''मॅडी (माधवन) सरांनी मला मेकअप, साज-श्रृंगार, मुलींसारखे कपडे घालणे, लोकांसमोर आकर्षक कसे दिसायचे याच्या टिप्स दिल्या.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रितिकाची रिअल लाइफ छायाचित्रे...