आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षापासून सलमान खानचा बॉडीगार्ड आहे शेरा, आता जुबैर विवादामुळे आला चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड स्टार सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एनजीओमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने खार पोलीस स्टेशनमध्ये शेरा बलात्काराची धमकी देत असल्याची एफआयर दाखल केली आहे. याच महिलेवर बिग बॉसमधील जुबैर खानला मदत करण्याची माहिती मिळत आहे. ही मदत करु नये अन्यथा बलात्कार करेन अशी धमकी सलमानचा बॉडीगार्ड शेरा देत असल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. जुबैद खाननेही सलमानविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. कोण आहे सलमानचा बॉडीगार्ड शेरा...
 
20 वर्षांपासून आहे सलमानचा बॉडीगार्ड...
पडद्यावर सलमान खान उत्कृष्ट बॉडीगार्डच्या रुपात अवतरला होका. मात्र पडद्यामागे तो आपला बॉडीगार्डशिवाय एक पाऊलही पुढे टाकत नाही. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली आहे, ती बॉडीगार्ड गुरमीत सिंह उर्फ शेराने. मागील 20 वर्षांपासून शेरा सलमानचा बॉडीगार्ड आहे.
 
बॉडी बिल्डिंगमध्ये ठरला होता ज्युनिअर मि. महाराष्ट्र...
सलमानला जेथे जायचे असते, त्या ठिकाणच्या एक दिवसअगोदरच शेरा आढावा घेत असतो. अनेकदा रस्त्यावरील गर्दी दूर करण्यासाठी त्याला पाच किलोमीटरची पायपीटदेखील करावी लागते. बॉडी बिल्डिंगमधअये ज्युनिअर मिस्टर मुंबई आणि ज्युनिअर मिस्टर महाराष्ट्र हे खिताब त्याने आपल्या नावी केले आहे. शेरा प्रत्येक ठिकाणी सलमानसोबत हजर असतो.
 
सलमानला म्हणतो भाई...
शेरा म्हणतो, की तो सलमानची एका मित्राप्रमाणे काळजी घेत असतो. शेरा मुंबईत सलमानच्या शेजारीच वास्तव्याला होता. कालांतराने तो त्याचा बॉडीगार्ड बनला. सलमानच्या म्हणण्यावर शेराने अलीकडेच विजक्रॉफ्ट नावाने स्वतःची इव्हेंट कंपनी सुरु केली आहे. याशिवाय टायगर सिक्युरिटी नावाने त्याची आणखी एक कंपनी आहे. ही कंपनी स्टार्सला सुरक्षा देते. सलमानला भाई म्हणणारा शेरा यापूर्वी भारतात येणा-या हॉलिवूड स्टार्सना सुरक्षा देण्याचे काम करत होता. शेरा सलमानच्या फॅमिली मेंबरसारखाच आहे.
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सलमानच्या बॉडीगार्डची ही निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...