आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Salman Khans Stunning Niece Alizeh Agnihotri

भेटा सलमान खानच्या ग्लॅमरस भाचीला, सोशल मीडियावर आहे अॅक्टिव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमानची भाची एलिजा अग्निहोत्री आपल्या मित्रासबोत) - Divya Marathi
(सलमानची भाची एलिजा अग्निहोत्री आपल्या मित्रासबोत)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान हिने नुकताच लंडनमध्ये आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी क्लिक झालेली सेलिब्रेशनची छायाचित्रे अर्पिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये अर्पिता तिचा नवरा आयुष शर्मा, आई सलमान खान आणि भाची एलिजा अग्निहोत्रीसोबत दिसत आहे. एलिजा ही अर्पिताची थोरली बहीण अलविराची मुलगी आहे.
सलमानचे चाहते त्याच्या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्यांना ओळखतात. त्याचे वडील सलीम खान, आई सलमा खान आणि हेलन, भाऊ अरबाज, सोहेल, बहिणी अलविरा आणि अर्पिता यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. मात्र आता सलमानची भाची एलिजासुद्धा आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे. सलमानच्या या लाडक्या भाचीला फोटो काढण्याचा छंद आहे. एलिजाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या वेगवेगळ्या लूकची अनेक छायाचित्रे पाहायला मिळतात.
एलिजा अग्निहोत्रीविषयी...
एलिजा सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्रीची मुलगी आहे. अलविराचे लग्न अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीसोबत झाले आहे. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एलिजा हे मुलीचे तर अयान हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. एलिजा त्यांची थोरली मुलगी आहे. सध्या मुंबईत ती आपले शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. मित्रांसह धमाल-मस्ती करणे, वाचन करणे आणि फिरणे हे तिचे आवडते छंद आहे. सुंदर असण्यासोबतच ती मनमौजी आहे.
मामी मलायका देणार का साथ?
एलिजा सध्या शिकत आहे. भविष्यात कोणत्या क्षेत्राची निवड करायची याचा निर्णय एलिजालाच घ्यायचा आहे. मात्र खान फॅमिलीतून केवळ मलायका अरोरा खान एकमेव अशी स्त्री आहे, जी बॉलिवूडमध्ये काम करत आहे. त्यामुळे भविष्यात एलिजाने आपल्या मामीच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली तर नवल वाटायला नको.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा एलिजा अग्निहोत्रीची ग्लॅमरस लूकची खास छायाचित्रे... ही सर्व छायाचित्रे एलिजाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.