एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आज (17 ऑक्टोबर) वयाची 50 वर्षे पूर्ण करत आहे. शाहिद कपूर-आलिया भट स्टारर 'शानदार'द्वारे कमबॅकसाठी सज्ज असलेला संजय याकाळात पार्टी आणि इव्हेंटमध्ये दिसत असतो. त्याच्यासोबत त्याची स्टायलिश पत्नी महीप संधू आवर्जुन दिसत असते. आता आईवडीलच ग्लॅमरस आहे म्हटल्यावर त्यांची मुलेही स्टायलिश असणारच. संजयची लाडकी लेक शनाया कपूर स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे.
शनाया आता 15 वर्षांची आहे. मात्र स्टाइलमध्ये ती तिच्या थोरल्या बहिणी अर्थातच सोनम कपूर, अंशुला कपूर, जान्हवी आणि खुशी कपूर यांच्या मागे नाही. बोनी कपूर आणि अनिल कपूर हे शनायाचे मोठे वडील अर्थातच काका आहेत. सोनम अनिल कपूरची तर अर्जुन कपूर, अंशुला, खुशी आणि जान्हवी कपूर ही बोनी कपूर यांची मुले आहेत.
सोशल मीडियावर शनायाची श्रीदेवीच्या मुलींसोबतची अनेक छायाचित्रे बघायला मिळतात. सध्या लाइमलाइटपासून दूर असेलली शनायासुद्धा आपल्या चुलत बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत भविष्यात नक्कीच सिनेसृष्टीत एन्ट्री घेईल, असे म्हणायला हरकत नाही.
शनाया शाहरुखची मुलगी सुहानाची बेस्ट फ्रेंड असून या दोघी अनेकदा आयपीएल मॅचच्या काळात एकत्र स्टेडिअमवर दिसल्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शनाया कपूरची फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतची खास छायाचित्रे...