आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे शाहरुखचा मुलगा आर्यन, लंडनमध्ये बिग बींच्या नातीसोबत घेतोय शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः नव्या नवेली नंदासोबत आर्यन खान - Divya Marathi
फाइल फोटोः नव्या नवेली नंदासोबत आर्यन खान
मुंबईः बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 नोव्हेंबर 1965 रोजी जन्मलेल्या एसआरकेला मुलगा आर्यन, मुलगी सुहाना आणि मुलगा अबराम हे तीन मुले आहेत. तिघांनी अद्याप बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केलेली नसली तरी, शाहरुखप्रमाणेच लोक यांना ओळखतात. मोठा मुलगा आर्यन अनेक निमित्तांवर शाहरुखसह दिसतो. येत्या 12 नोव्हेंबरला वयाची 18 वर्षे पूर्ण करणारा आर्यन लंडनच्या Seven Oaks शाळेत शिकतोय. आर्यन 18 वर्षांचा असला तरी हेल्थ आणि हाइटमध्ये तो पापा शाहरुखलासुध्दा मागे टाकत आहे.
शाहरुखच्या चाहत्यांनी आर्यनला तसे नेहमी छायाचित्रांच्या माध्यमातून मोठे होताना पाहिले आहे. जेव्हा कधी आर्यनची नवीन छायाचित्रे समोर येतात तेव्हा त्याच्या चेह-यात बदल झालेला दिसून येतो. आर्यन बालपणापासूनच पापा शाहरुख आणि आई गौरीचा लाडका आहे. मात्र, बालपणापासून तो शाहरुखच्या जास्त जवळ असल्याचे दिसून येते. आर्यनपेक्षा लहान त्याची बहीण सुहाना आणि भाऊ अबराम आहे.
आर्यनने शाहरुखच्या 'कभी खुशी कभी गम' सिनेमात चाइल्ड आर्टिस्टची भूमिका केले होती. हा सिनेमा 2001मध्ये रिलीज झाला होता तेव्हा आर्यन 4 वर्षांचा होता. आर्यन लंडनच्या ज्या शाळेत शिक्षण घेतो तिथेच अमिताभ बच्चन यांनी नात नव्या नवेलीसुध्दा शिकते. आर्यनने नव्यासह काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती.
शाहरुख खानच्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याचा थोरला मुलगा आर्यनची फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतची निवडक छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आर्यनची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...