Home »Gossip» Meet Shashi Kapoor Grand Daughter Shaira And Lesser Know Members Of His Family

ही आहेत शशी कपूर यांची नातवंडे, लाइमलाइटपासून दूर राहतात हे फॅमिली Members

दिव्य मराठी वेब टीम | Dec 05, 2017, 15:52 PM IST

  • आलिया कपूर, शायरा कपूर, झेक कपूर, इनसेटमध्ये शशी कपूर


मुंबईः ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे वयाच्या 79 वर्षी निधन झाले. 4 डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. 18 मार्च 1938 रोजी कोलकाता येथे जन्मलेले शशी पृथ्वीराज कपूर यांचे धाकटे चिरंजीव आणि राज कपूर, शम्मी कपूर यांचे भाऊ होते. 1958 मध्ये परदेशी तरुणी जेनिफर कँडलसोबत शशी विवाहबद्ध झाले होते. या दाम्पत्याला कुणाल, करण आणि संजना कपूर ही तीन मुले आहेत.शशी कपूर अनंतात विलीन, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार, दिग्गजांनी दिला अखेरचा निरोप

लाइमलाइटपासून दूर राहतात शशी कपूर यांची नातवंडे...
- शशी कपूर यांचा थोरला मुलगा कुणाल कपूरचे लग्न रमेश सिप्पी यांची कन्या शीना सिप्पी झाले होते. या दाम्पत्याला एका मुलगा आणि एक मुलगी आहे. शायरा लौरा कपूर हे त्यांच्या मुलीचे आणि जहान पृथ्वीराज कपूर हे मुलाचे नाव आहे.
- कुणाल कपूर आणि शीना सिप्पी यांचा घटस्फोट झाला आहे.
- शायरा आणि जहान हे दोघेही लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.
- शशी कपूर यांचा दुसरा मुलगा कुणाल कपूरच्या पत्नीचे नाव लोरना आहे. या दाम्पत्यालासुद्धा एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
- झेक हे मुलाचे तर आलिया हे करण कपूरच्या मुलीचे नाव आहे.
- करण कपूर पत्नी आणि मुलांसोबत यूएसमध्ये वास्तव्याला आहे.
- शशी कपूर यांची कन्या संजना कपूरचे लग्न वाल्मिक थापरसोबत झाले असून या दाम्पत्याला हमीर हा एक मुलगा आहे.
- विशेष म्हणजे शशी कपूर यांची पाचही नातवंडे लाइमलाइटपासून दूर राहतात. फॅमिली पार्टीजमध्ये क्वचितच हे दिसतात. 10 Unknown Facts: शशी यांची शिस्त इतकी होती की कुटुंबीय 'अंग्रेज कपूर' नावाने बोलवायचे


पुढील स्लाईड्सवर बघा, शशी कपूर यांच्या मुलांची आणि नातवंडांची छायाचित्रे...

Next Article

Recommended