मुंबई- सुपरस्टार
सलमान खान जिथे जातो, तिथे त्याचा बॉडीगार्ड शेर नेहमी त्याच्यासोबत असतो. मागील 17 वर्षांपासून सलमानची रक्षा करणारा गुरमीत सिंह जॉली अर्थातच शेरा आज केवळ त्याचा कर्मचारी नाहीये. सलमान त्याला
आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे मानतो. त्याच्यासोबत राहून-राहून शेरा आज बॉलिवूडचा प्रसिध्द बॉडीगार्ड बनला आहे. जाणून घेऊया त्याच्याविषयी काही गोष्टी...
सलमानसाठी पाच-पाच किमी पायीसुध्दा चालतो शेरा-
सलमानला ज्या ठिकाणी जायचे असते, शेरा त्याच्या एक दिवसापूर्वी त्या ठिकाणी पोहोचतो. त्या ठिकाणाची सर्व पाहणी करतो. अनेकदाच गर्दा बाजूला सारण्यासाठी शेरा पाच-पाच किमीपर्यंत पायी चालत जातो. बॉडी बिल्डिंगमध्ये ज्यूनिअर मि. मुंबई आणि ज्यूनिअर मि. महाराष्ट्रसारखे किताब नावी केलेला शेरा रात्र-दिवस सलमानसोबत असतो.
हॉलिवूड स्टार्सना देत होता सुरक्षा-
शेरा एका मित्राप्रमाणे सलमानची सुरक्षा करत होता. शेरा मुंबईमध्ये सलमानच्या शेजारी राहत होता. त्यानंतर त्याचा बॉडीगार्ड बनला. सलमानच्या म्हणण्यावरून शेराने मागील वर्षी स्वत:ची कंपनी 'विजक्रॉफ्ट'सुध्दा सुरु केली. सोबतच, त्याची आणखी 'टायगर सिक्योरिटी' कंपनीसुध्दा आहे. ही कंपनी स्टार्सना सुरक्षा गार्ड पुरवते. सांगितले जाते, की सलमानला 'भाई' म्हणणारा शेरा पूर्वी हॉलिवूड स्टार्सना सुरक्षा देत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानच्या बॉडीगार्डची निवडक छायाचित्रे...