आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 Star Daughters : कुणाचे सुरु आहे शिक्षण, तर कुणी केली करिअरला सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - मुलगी अथियासोबत सुनील शेट्टी, उजवीकडे - मुलगी नर्मदा (टीना)सोबत गोविंदा)
मुंबईः बॉलिवूडमध्ये 'हीरो नंबर 1' नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेता गोविंदा यांची लाडकी लेक नर्मदा उर्फ टीना मोठ्या पडद्यावर पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. 'सेकंड हँड हसबंड' या सिनेमाद्वारे नर्मदा आपल्या करिअरचा श्रीगणेशा करत आहे. गेल्या काही दिवसांपासून नर्मदा आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यासाठी जयपूरसह देशातील अनेक शहरांमध्ये ती लाइव्ह कॉन्सर्ट करणार आहे. जून महिन्यात जयपूर येथे कॉन्सर्ट होणारेय. 'सेकंड हँड हसबंड'मध्ये नर्मदासह धर्मेंद्र, गिप्पी ग्रेवाल आणि गीता बसरा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
सिनेमात पदार्पणासाठी बदलेले नाव
नर्मदाने बॉलिवूड पदार्पणासाठी स्वतःचे नाव बदलेले आहे. इंडस्ट्रीत आता ती टीना नावाने ओळखली जाणारेय. याच नावासोबत ती डेब्यू करत आहेत.
आत्तापर्यंत 30 सिनेमांची नाकारली ऑफर
गोविंदाच्या पत्नी सुनीता आहुजा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की त्यांच्या मुलीने 'सेकंड हँड हसबंड' सिनेमा स्वीकारण्यापूर्वी तब्बल 30 सिनेमांच्या ऑफर्स नाकारल्या होत्या. स्क्रिप्ट पसंत न पडल्याचे तिने कारण दिले होते.
अनेक स्टार लेकींचे तारुण्यात पदार्पण
आम्ही तुम्हाला गोविंदाच्या लेकीविषयी सांगितले. मात्र इंडस्ट्रीत अनेक सेलिब्रिटींच्या मुली आता मोठ्या झाल्या असून काही जणी शिक्षण घेत आहेत, तर काहींनी आपल्या करिअरला सुरुवात केली आहे.
Divyamarathi.com या पॅकेजमधून तुमची भेट या स्टार लेकींसोबत करुन देत आहे.
पदार्पणासाठी सज्ज आहे सुनील शेट्टीची लेक अथिया
बॉलिवूडमध्ये 'अन्ना' नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेता सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 22 वर्षीय अथियाचा पहिला सिनेमा 'हीरो' येत्या 25 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणारेय. या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजसुद्धा सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करतोय. निखिल अडवाणी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अथियाने न्युयॉर्क फिल्म अकॅडमीतून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये भेटा, आणखी 10 स्टार डॉटर्सना...