आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे सनी लिओनीची वहिनी, बघा भाऊ आणि सासू-सास-यांसोबतचे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: शाहरुख खान स्टारर 'रईस' या सिनेमाने 100 कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय केला आहे. सिनेमातील सनीवर चित्रीत झालेले लैला... हे गाणे पसंत केले जात आहे. प्रेक्षकांच्या मिळणा-या प्रतिसादामुळे सनी आनंदी आहे. पोर्न इंडस्ट्रीतून बॉलिवूडकडे वळलेल्या सनीच्या प्रोफेशनल लाइफविषयी लोकांना बरेच काही ठाऊक आहे. मात्र तिचे खासगी आयुष्य आणि नातेवाईकांविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. 
 
स्टायलिस्ट आहे सनीची वहिनी...
सनी लिओनीचा भाऊ संदीप वोहराचे मागील वर्षी डिसेंबर महिन्यात लग्न झाले. त्याच्या पत्नीचे नाव करिश्मा नायडू (आता वोहरा) असून ती व्यवसायाने फॅशन स्टायलिस्ट-वॉर्डरोब कंसल्टंट आहे. करिश्माने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींरसाठी स्टायलिस्ट म्हणून काम केले आहे. इन्स्टाग्रामवर अॅक्टिव असलेल्या करिश्माने पती संदीप आणि नणंद सनी लिओनीसोबतचे अनेक फोटोज शेअर केले आहेत. 

प्रोफेशनल शेफ आहे सनीचा भाऊ...
सनीचे आईवडील आता हयात नाहीत. 2008 मध्ये सनीच्या आईचे आणि 2010 मध्ये कॅन्सरमुळे तिच्या वडिलांचे निधन झाले होते. सनीचा धाकटा भाऊ संदीप कॅलिफोर्नियामधील प्रसिद्ध 'किंग्स रो गेस्ट्रो' पबमध्ये एग्झिक्यूटिव्ह शेफ म्हणून काम करतो. त्याचे डिशेज तिथे विशेष पसंत केले जातात. बोलवर्ड मॅगझिननुसार, 'संदीप वोहराने अतिशय कमी वयात या पबमधून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि स्वबळावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.' इतकेच नाही तर संदीपच्या उत्कृष्ट कुकिंगमुळे या पबला काही वर्षांतच कॅलिफोर्नियातील लोकप्रियता मिळाली आहे.  
 
न्यूयॉर्कमध्ये राहतात सनीचे सासू-सासरे...
सनीने 2011 मध्ये डेनिअल वेबरसोबत लग्न केले होते. The Disparrows या म्युझिकल रॉक बँडचा लीड गिटारिस्ट असलेला डेनिअल सनीचा मॅनेजरसुद्धा आहे. डेनिअलचे पेरेंट्स Massapequa (न्यूयॉर्क) मध्ये वास्तव्याला आहेत. सनी आता मुंबईत स्थायिक झाली असली तरी ती नेहमीच तिच्या सासू-सास-यांकडे जात असते. त्यांच्यासोबतचे फोटोजसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 

पुढील स्लाईड्सवर बघा, सनी लिओनीचे फॅमिली PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...