आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Super Maamu Salman Khan's Nephew Super Sharma

सलमानचा भाचा बनला 'सुपर शर्मा', क्युट लूकमध्ये दिसला 'आहिल'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आहिल खान - Divya Marathi
आहिल खान
मुंबई: अलीकडेच सोशल मीडियावर सलमान खानचा भाचा आहिलचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आहिलच्या नाइट ड्रेसवर 'सुपर शर्मा' लिहिलेले दिसते. या ड्रेसमध्ये झोपलेला आहित अगदी गोंडस दिसतोय. अर्पिताची डिलिव्हरी 30 मार्चला झाली होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अर्पिता घरी पोहोचली. त्यावेळी सलमानने भाच्याला BMW 730LD कार गिफ्ट केली. या कारची किंमत जवळपास 1.07 कोटी आहे.
सलमानने स्वत: घेतली नैनीची मुलाखत...
बातम्यानुसार, सलमान स्वत: भाचा आहिलसाठी नैनी (लहान मुलांना सांभाळणारी महिला) शोधत आहे. त्यासाठी त्याचे घर गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये जवळपास 25 महिला मुलाखतीसाठी पोहोचल्या होत्या. एका सूत्राच्या सांगण्यानुसार, '25 महिलांची मुलाखत घेण्यात आली. त्यासाठी सलमानसह घरातील सर्व सदस्य उपस्थित होते. या मुलाखती स्वत: सलमानने घेतल्या आणि काहींवर रिव्ह्यूसुध्दा दिला आहे. संध्याकाळी 5 वाजता सुरु झालेल्या या मुलाखती रात्री 9 वाजेपर्यंत चालल्या. त्याने आहिलसाठी बेस्ट नैनी निवडली आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आहिलचे मामा सलमानसोबत आणि वडील आयुषसोबतचे काही PHOTOS...