आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Superstar Salman Khan Niece Alizeh Agnihotri

ही आहे वादग्रस्त वक्तव्य करणा-या सल्लूमियाँची लाडकी भाची, जाणून घ्या या ग्लॅमरस तरुणीविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः (वर) सलमान खान आणि एलिजा, (खाली) डावीकडे एलिजा, उजवीकडे - आई अलविरा आणि मावशी अर्पितासोबत एलिजा अग्निहोत्री - Divya Marathi
फाइल फोटोः (वर) सलमान खान आणि एलिजा, (खाली) डावीकडे एलिजा, उजवीकडे - आई अलविरा आणि मावशी अर्पितासोबत एलिजा अग्निहोत्री
मुंबई - बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आला आहे. सलमान खानने 1993 मधील मुंबई बॉम्स्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनला फाशी देण्याचा विरोध केला होता. त्याच्या या विरोधावर या प्रकरणाशी संबंधित सरकारी वकील उज्ज्वल निकम भडकले. सलमानवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराच त्यांनी दिला. या सगळ्या प्रकारामुळे सलमान खानने त्याच्या वडिलांच्‍या सांगण्‍यावरून माफी मा‍‍गितली आहे. शिवाय आपण याकूबला निर्दोष आहे, असे म्‍हटले नाही, असेही त्‍याने स्‍पष्‍ट केले.
सलमानचे वडील प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. त्याच्या घरातील बरीच मंडळी सिनेसृष्टीत कार्यरत आहे, तर काही जण दुस-या क्षेत्रात काम करत आहेत. त्याच्या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्यांना ओळखतात. सलीम खान, आई सलमा खान आणि हेलन, भाऊ अरबाज, सोहेल, बहिणी अलविरा आणि अर्पिता यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. मात्र आता सलमानची भाची एलिजासुद्धा आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे. सलमानच्या या लाडक्या भाचीला फोटो काढण्याचा छंद आहे. एलिजाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या वेगवेगळ्या लूकची अनेक छायाचित्रे पाहायला मिळतात.
एलिजा अग्निहोत्रीविषयी...
एलिजा सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्रीची मुलगी आहे. अलविराचे लग्न अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीसोबत झाले आहे. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एलिजा हे मुलीचे तर अयान हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. एलिजा त्यांची थोरली मुलगी आहे. सध्या मुंबईत ती आपले शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. मित्रांसह धमाल-मस्ती करणे, वाचन करणे आणि फिरणे हे तिचे आवडते छंद आहे. सुंदर असण्यासोबतच ती मनमौजी आहे.
मामी मलायका देणार का साथ?
एलिजा सध्या शिकत आहे. भविष्यात कोणत्या क्षेत्राची निवड करायची याचा निर्णय एलिजालाच घ्यायचा आहे. मात्र खान फॅमिलीतून केवळ मलायका अरोरा खान एकमेव अशी स्त्री आहे, जी बॉलिवूडमध्ये काम करत आहे. त्यामुळे भविष्यात एलिजाने आपल्या मामीच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली तर नवल वाटायला नको.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा एलिजा अग्निहोत्रीची ग्लॅमरस लूकची खास छायाचित्रे... ही सर्व छायाचित्रे एलिजाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत...