आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photos: अतिशय ग्लॅमरस आहे वरुण धवनची पुतणी, लाइमलाइटपासून कायम असते दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिल्ममेकर डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुन धवन स्टारर 'जुडवां 2' हा चित्रपट तिकिटबारीवर चांगला व्यवसाय करत आहे. चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांत 85.30 कोटींचा व्यवसाय केला आहे. बी-टाउन में वरुण की गणना स्टाइलिश आणि पॉप्युलर स्टार्समध्ये होते. वरुणप्रमाणेच त्याची पुतणी अंजिनी धवनसुद्धा स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे, परंतु ती लाइमलाईटपासून दूर राहणे पसंत करते.

वरुनच्या चुलत भावाची मुलगी आहे अंजिनी...
16 वर्षांची अंजिनी वरुनचा चुलत भाऊ आणि अभिनेता सिद्धार्थ धवनची मुलगी आहे. अंजिनी अभिनेते अनिल धवन यांची नात आहे. फिल्ममेकर डेव्हिड धवन यांचे मोठे बंधू अनिल यांनी 'चेतना' (1970) सिनेमातून डेब्यू केले होते. पुढे त्यांनी 'प्यार की कहानी' (1971), 'पिया का घर' (1972), 'नागिन' (1976), 'पुरानी हवेली' (1989), 'करिश्मा काली का' (1990), 'तेरी तलाश में' (1990), 'होगी प्यार की जीत' (1999), 'जोड़ी नबंर 1' (2001), 'सनम हम आपके हैं' (2009), 'रास्कल्स' (2011) सह अनेक चित्रपट केले. याशिवाय कोरा कागज, हिरा, मैं लक्ष्मी तेरी आंगन की या टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. अंजिनीचे वडील सिद्धार्थ धवन हेदेखील अभिनेते आहेत. 

इन्स्टाग्रामवर अॅक्टिव आहे अंजिनी...
स्टायलिश आणि ग्लॅमरस अंजिनी धवन इंस्टाग्राम स्टार असून तिचे जवळपास 70 हजार लोक फॉलोअर्स आहेत. अंजिनी श्रीदेवीची छोटी मुलगी खुशीची बेस्ट फ्रेंड आहे. खुशीसोबतचे अनेक फोटोज अंजिनीने शेअर केले आहेत. एका खास फोटोमध्ये अंजिनी खुशीला किस करताना दिसत आहे. याशिवाय ती संजय कपूरची मुलगी शनाया, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचीही जवळची मैत्रिण आहे. या फ्रेंड्ससोबतचे पार्टी करतानाचे अनेक फोटोज अंजिनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  
 
पुढील स्लाईड्सवर बघा, वरुणची पुतणी अंजिनी धवनचे 10 Photo...
बातम्या आणखी आहेत...