आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एन्काउंटर स्पेशलिस्ट\' दया नायक होते BIG B चे बॉडीगार्ड, भेटा Celebsच्या पाठीराख्यांना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'एन्काउंटर स्पेशलिस्ट\' दया नायक, इनसेटमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत दया नायक - Divya Marathi
\'एन्काउंटर स्पेशलिस्ट\' दया नायक, इनसेटमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत दया नायक
मुंबईः चकमक फेम पोलिस अधिकारी दया नायक पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाले आहेत. दया नायक यांना जुलै 2015 मध्ये निलंबित करण्यात आले होते. खातेनिहाय चौकशीनंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले असल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
बिग बींचे होते बॉडीगार्ड
दया नायक हे 1995 च्या बॅचचे उपनिरीक्षक. बारा ते तेरा वर्षांपूर्वी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड होते. त्यानंतर क्राईम ब्रॅचमध्ये बदली झाल्यानंतर गुन्हेगारी टोळ्याविरुद्ध बनविण्यात आलेल्या ‘एन्काऊंटर’ पथकात नियुक्ती झाल्यानंतर ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले. ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या दया यांच्या नावे 80 ‘एन्काऊंटर’ आहेत. विरोधी टोळीकडून सुपारी घेवून गुंडांना खोट्या चकमकीत मारले, त्यातून कोट्यावधीची माया मिळविल्याचा आरोपातून निलंबन करण्यात आले होते. मात्र ‘मॅट’ व त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले होते.
आता जितेंद्र शिंदेंकडे बिग बींची सुरक्षा
करिअरच्या सुरुवातीच्या काळात दया नायक यांनी बिग बींना सुरक्षा पुरवण्याचे काम केले होते. इतकेच नाही तर सात वर्षांपूर्वी दया नायक यांनी कर्नाटकमधील आपल्या गावी आईच्या स्मृतीप्रित्यर्थ 1 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या शाळेचे उद्घाटन करण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना बोलावले होते. दया नायक यांच्या नंतर बिग बींच्या सुरक्षेची जबाबदारी आता जितेंद्र शिंदे नावाच्या व्यक्तीकडे आहे. जितेंद्र शिंदे यांची स्वतःची सिक्युरिटी एजन्सी असून ते प्रत्येकवेळी बिग बींसोबत असतो. शिवाय त्यांच्या सिक्युरिटी एन्जसीमधील आणखी तीन ते चार बॉडीगार्ड्स बिग बींसोबत असतात.

स्टार्स आणि त्यांच्या बॉडीगार्ड्समधील नाते
एकेकाळी अमिताभ यांच्यासाठी बॉडीगार्ड म्हणून काम करणा-या दया नायक यांच्या शाळेच्या उद्घाटनाला बिग बींनी हजेरी लावली होती. यावरुनच त्यांच्यात आणि दया नायक यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे दिसून आले. बिग बींप्रमाणेच बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांचे त्यांच्या बॉडीगार्ड्सोबत मैत्रीचे संबंध आहेत. चाहत्यांच्या गराड्यात स्टार्सना गाडीपासून ठिकाणापर्यंत आणि पुन्हा गाडीपर्यंत आणणे खूप अडचणीचे काम असते. बॉडीगार्ड्सकडून मिळणा-या सुरक्षाच्या बदल्यात स्टार्सही त्यांच्या भविष्याची सुरक्षा करतात.
स्टार्स आणि त्यांच्या बॉडीगार्ड्समधील नाते जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...