आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet The Lesser Known Brothers And Sisters Of Bollywood Stars

भेटा लाइमलाइटपासून कायम दूर राहणा-या बॉलिवूड Celebsच्या या 10 बहीणभावंडांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे शाहरुख खान-शहनाज, उजवीकडे कंगना आणि रंगोली - Divya Marathi
डावीकडे शाहरुख खान-शहनाज, उजवीकडे कंगना आणि रंगोली
मुंबई: अलीकडेच कंगना रनोटची थोरली बहीण रंगोली एका मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली आहे. रंगोली कंगनाची बिजनेस मेकर आणि तिची खास मैत्रीणसुध्दा आहे. परंतु ती लाइमलाइटपासून दूर राहते.
अॅसिड अटॅक सरव्हाइवर आहे रंगोली...
रंगोली अॅसिड अटॅक सरव्हाइवर आहे. त्या घटनेनंतर कंगनाने तिला या धक्क्यातून बाहेर पडण्यास मदत केली होती. रंगोलीचे लग्न झाले आहे आणि ती कंगनाची सर्व कामे पाहते. कंगना म्हणते, 'आम्हीसुध्दा इतर बहिणींसारखे छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडतो आणि एकमेकींवर रुसतो. परंतु काही वेळातच बोलायला लागतो.' कंगनाचा धाकटा भाऊ अक्षितसुध्दा मीडियापासून दूर असतो. परंतु बहिणींची पूर्ण काळजी घेतो.
हेसुध्दा आहेत बॉलिवूडचे Non-popular स्टार्स Siblings
शाहरुख खान, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन, आलिया भट्ट, हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, बिपाशा बसु आणि सोनाक्षी सिन्हासारख्या इतर स्टार्सचे भाऊ-बहीणसुध्दा कमी लोकांना ठाऊक आहेत.
शाहरुख खान आणि शहनाज लालारुख...
शहनाज लालारुख शाहरुख खानची थोरली बहीण आहे. शहनाजने शाहरुखच्या चांगल्या-वाईट काळात साथ दिली आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर शहनाज तणावात गेली होती. त्यावेळी शाहरुखने तिची जबाबदारी उचलली होती. शहनाजला कॅमे-यासमोर यायला आवडत नाही. ती कोणत्या पार्टीत किंवा पब्लिक इव्हेंटमध्येसुध्दा दिसत नाही. ती शाहरुखची बहीण असूनसुध्दा खूप साधी-सरळ आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर Non-popular स्टार्सच्या बहीण-भावांविषयी...