आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री रुपात 56 देशांत केलंय नृत्य, आता 'गंगाजल 2'मध्ये बनणार ITEM GIRL

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : क्वीन हरीश)
मुंबईः सिनेनिर्माते-दिग्दर्शक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्या सिनेमांत नवनवीन कुल्प्त्या अमंलात आणत असतात. यावेळी दिग्दर्शक प्रकाश झासुद्धा त्यांच्या आगामी 'गंगाजल 2' या सिनेमातील असेच काही तरी नवीन करताना दिसणार आहेत. बातमी आहे, की त्यांनी आयटम गर्लच्या रुपात एखाद्या अभिनेत्रीला कास्ट न करता एका तरुणाला तरुणीच्या रुपात पडद्यावर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून क्वीन हरीश आहे. हरीशने स्त्री रुपात नृत्य सादर करुन जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्वीन हरीश या नावाने त्याला ओळखले जाते.
56 देशांत केलंय सादरीकरण
राजस्थानच्या जैसलमेर येथे जन्मलेल्या हरीशने फिमेल डान्सरच्या रुपात आत्तापर्यंत तब्बल 56 देशांत सादरीकरण केले आहे. त्याला बेले डान्ससाठी ओळखले जाते. हरीश एका दशकापासून आपल्या कलेमुळे लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे.
'गंगाजल 2' द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण
आजवर अनेक लाइव्ह शोमध्ये आपल्या कलेचं सादरीकरण करणारा हरीश प्रियांका चोप्रा स्टारर 'गंगाजल 2' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. गायिका ऋचा शर्माच्या आयटम नंबरवर तो डान्स करताना दिसणार आहे. या आयटम नंबरचे शूटिंग पूर्ण झाल्याचे समजते.
डान्सिंग स्किल्सने सर्वांना केले चकित
हरीशने 'गंगाजल 2'च्या सेटवर आपल्या नृत्याने सर्वांना चकित केले. केवळ चार तासांत हरीशने गाण्याचे शूटिंग पूर्ण केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, क्वीन हरीशची खास छायाचित्रे...