आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: भाग्यश्रीसह या कलाकारांच्या मुलांचे तारुण्यात पदार्पण, भेटा सेलेब्सच्या Young मुलांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लन आणि भाग्यश्री आपल्या मुलांसोबत) - Divya Marathi
(अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लन आणि भाग्यश्री आपल्या मुलांसोबत)
‘मैने प्यार किया या सिनेमामुळे एका रात्रीत स्टारपद मिळवणा-या अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा आता बराच मोठा झाला आहे. आता भाग्यश्री तिचा मुलगा अभिमन्यूचे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी ती सलमान खानची मदत घेणार असल्याचे म्हटले जात आहे. भाग्यश्रीचा मुलगा आता 26 वर्षांचा झाला आहे. भाग्यश्रीप्रमाणेच बी टाऊनमधील अनेक कलाकारांची मुले आता बरीच मोठी झाली आहेत. अभिनेत्री रती अग्निहोत्रीचा मुलगा तरूण विरमणीने 'लव्ह यू सोनियो' या सिनेमातून बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली आहे. 
 
भाग्यश्री आणि रती अग्निहोत्री या सेलिब्रिटींसोबतच गोविंदा, अनिल कपूर, पूनम ढिल्लन, रजा मुराद या सेलिब्रिटींच्या मुलांनीही तारुण्यात पदार्पण केले आहे. या सेलिब्रिटींची मुले खरं तर अद्याप कॅमे-यासमोर आलेली नाहीत. त्यामुळे सामान्य लोक त्यांना ओळखत नाहीत. 
आज या पॅकेजमधून आम्ही तुमची भेट बी टाऊनमधील कलाकारांच्या तरुण मुलांशी घालून देत आहोत. या तरुणांना तुम्ही कदाचित पहिल्यांदाच बघाल. 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा कशी दिसतात नावाजलेल्या सेलिब्रिटींची तरुण मुले...   
बातम्या आणखी आहेत...