आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Younger Version Of Kareena Kapoor From 'Kabhi Khushi Kabhie Gham'

Then&Now: 14 वर्षांत एवढी बदलली K3G ची छोटी 'करीना', नंतर का आली नाही सिनेमात?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालविका राज - पुर्वी आणि आता - Divya Marathi
मालविका राज - पुर्वी आणि आता

मुंबईः दिग्दर्शक करण जोहरच्या 2001 मध्ये रिलीज झालेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाच्या रिलीजला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. 14 डिसेंबर 2001 रोजी रिलीज झालेल्या अमिताभ-जया, शाहरुख खान, काजोल आणि हृतिक रोशन-करीना कपूर स्टारर या फॅमिली एन्टरटेनरने प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळवली होती. या सिनेमात करीना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारणारी मालविका राज हिने साकारली होती. आता मालविका मोठी झाली आहे. तिच्या लूकमध्येही बराच बदल झाला आहे. divyamarathi.com ने अलीकडेच मालविकासोबत खास बातचित केली. यावेळी तिने आपल्या खासगी आयुष्यासोबतच करिअरशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. चला जाणून घेऊया काय म्हणतेय मालविका...

'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील बालकलाकाराची भूमिका कशी मिळाली ?
- ही खूप रंजक कहाणी आहे. मी शालेय दिवसात टॉम बॉय होती. फुटबॉल खेळताना मुलांना हरवत होते. करण जोहरचे त्यावेळचे सहायक दिग्दर्शक सोहम यांनी मला पाहिले होते. त्यांनी माझ्या शिक्षिकेकडे माझ्याविषयी चौकशी केली. सोहम यांनी माझा फोन नंबर मागितला. त्यावेळी माझा नंबर का हवा ? असा प्रश्न मी त्यांना विचारला. तेव्हा प्राचार्यांना नंबर हवा, असे उत्तर मला मिळाले. आता प्रिंसिपल मला शाळेतून काढून टाकणार किंवा आणखी दुसरीही कुठली गोष्ट असू शकते, असे विचार माझ्या मनात आले. मात्र सोहम यांनी माझ्या आईला फोन केला आणि 'कभी खुशी कभी गम' या सिनेमात मी करीनाच्या बालपणीची भूमिका साकारावी अशी इच्छा व्यक्त केली. करण आणि यश अंकल यांना माझे पापा आणि आजी ओळखत होते. सुरुवातीला माझे पापा यासाठी तयार नव्हते. त्यांच्या मते, आधी मी शिक्षण पूर्ण करावे. मात्र जेव्हा यश अंकल यांनी ऑडीशनसाठी पापांना फोन केला, तेव्हा त्यांनी होकार दिला. 300 मुलींमधून माझी या भूमिकेसाठी निवड झाली.
K3Gनंतर का सिनेमांमध्ये झळकली नाही मालविका... जाणून घ्या पुढील स्लाईडवर...