आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पीके'पासून 'दंगल'पर्यंत, आमिर खानच्या सिनेमांत झाल्या आहेत या MISTAKES

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खान 52 वर्षांचा झाला आहे. 14 मार्च 1965 रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. त्याचे संपूर्ण नाव आमिर हुसैन खान आहे. त्याच्या वडिलांचे नाव ताहिर हुसैन आणि आईचे नाव जीनत हुसैन आहे. आमिर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर बालकलाकाराच्या रुपात झळकला होता. त्याचे काका नासिर हुसैन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘यादों की बरात’ (1973) हे त्या सिनेमाचे नाव होते.   
 
आमिर खानने 'कयामत से कयामत तक'पासून ते अलीकडेच आलेल्या 'दंगल'पर्यंत एकाहून एक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये अभिनयाची मोहोर उमटवली आहे.  पण सिनेमांमधील परफेक्शननंतरसुद्धा त्याच्या सिनेमांमध्ये काही उणीवा दिसून येतात. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला आमिरच्या सिनेमांमध्ये झालेल्या  MISTAKES विषयी सांगत आहोत... 
 
MISTAKE NO. 1 (पीके)
'पीके'च्या मते, तो कोणत्याही व्यक्तीचा हात पकडून त्याच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे आकलन करु शकतो. जर पीके एका भोजपुरी सेक्स वर्करचा हात सहा तास पकडून ठेवतो, तेव्हा त्याला कंडोमच्या वापराविषयी का कळत नाही. जग्गूच्या ऑफिसमध्ये कंडोमचे पाकिट बघून तो ते ओळखू का शकला नाही?
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, आमिरच्या कोणकोणत्या सिनेमांमधून आढळून आल्या आहेत चुका... 
बातम्या आणखी आहेत...