आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मिस्टर इंडिया\' झाला 30 वर्षांचा, पाहा त्यावेळी सेटवर कसा असायचा नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिस्टर इंडियाच्या सेटवर श्रीदेवी आणि अनिल कपूर. - Divya Marathi
मिस्टर इंडियाच्या सेटवर श्रीदेवी आणि अनिल कपूर.
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडच्या पहिला साय-फाय चित्रपट असलेल्या मिस्टर इंडिया चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. पण तरीही या चित्रपटाची लोकप्रियता आजही लोकांमध्ये कायम असल्याचे पाहायला मिळते. 25 मे 1987 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. 

त्या काळी काळाच्या पार पुढे जाऊन तंत्रज्ञानावर आधारित असा हा चित्रपट तयार करण्यात आला होता. या चित्रपटाच बॉलिवूड पटासाठी आवश्यक असलेल्या मसाल्याबरोबरच नावीण्य असल्याने लोकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी या चित्रपटाबाबत बोलताना सांगितले की, हा चित्रपट कोणत्याही स्टारच्या स्टारडममुळे चालला असे म्हणताच येणार नाही. तर हा चित्रपटच एवढा सुंदर होता की लोकांनी त्यावर प्रेम केले. विशेष म्हणजे या चित्रपटाचे पूर्ण शुटिंग खरे होते. यात कोणत्याही प्रकारचे पोस्ट प्रोडक्शन करण्यात आलेले नव्हते. कोणत्याही प्रकारचे स्पेशल इफेक्ट्स त्यात नव्हते.  

बोनी कपूर पुन्हा एकदा श्रीदेवीबरोबर चित्रपट घेऊन येत आहे. मॉम असे नाव असलेला हा चित्रपट श्रीदेवीचा 300 वा चित्रपट असणार आहे. त्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना यांच्या भूमिकाही असतील. या चित्रपटाने ती चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण करणार आहे. रवी उद्यावार दिग्दर्शित आणि ए आर रेहमानचे संगीत असलेला हा चित्रपट 7 जुलैला रिलीज होतोय. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, मिस्टर इंडिया चित्रपटाच्या सेटवरील त्याकाळचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...