आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl: एकेकाळी नक्षली होते मिथून दा, एका दुर्दैवी घटनेने बदलले संपूर्ण आयुष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सरच्या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आज वयाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत. दमदार आवाज, पिळदार शरीरयष्टी, लूक्स आणि हटके स्टाईल... बॉलिवूडमध्ये हीरोची असलेली ही ओळख मिथून चक्रवर्ती यांनी आपल्या डान्सिंग स्टाईलने बदलली. दिसायला अगदी साधारण, मात्र आपल्या डान्सिंगने कुणालाही भूरळ घालणा-या मिथून चक्रवर्ती उर्फ मिथून दा यांनी गॉडफादर किंवा सिनेपार्श्वभूमी नसतानादेखील बी टाऊनमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 

नक्षलीपासून ते सिनेसृष्टीचा प्रवास... 
मिथून दांचा जन्म 16 जून 1947 रोजी कोलकत्यातील एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. मोठाच नव्हे तर छोटा पडदासुद्धा काबीज करणा-या मिथून दांचे आयुष्य एकेकाळी जंगल, बंदुकी, चळवळी यांमध्ये गुरफटले होते. एकेकाळी नक्षलवादी चळवळीत सहभागी असलेले मिथून दा दीर्घ काळापर्यंत भूमिगत होते. पण सख्ख्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर ते नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडले आणि मायानगरीत दाखल होऊन 'डिस्को डान्स' या सिनेमाद्वारे स्वतःचे अणगिक चाहते निर्माण केले.
 
मिथून दांचे बालपणीचे नाव गौरांग चक्रवर्ती असे होते. कोलकत्यातील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून त्यांनी केमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक पुरस्कार आपल्या नावी केले आहेत. त्यांना आत्तापर्यंत दोनदा फिल्मफेअर पुरस्कार आणि तीनदा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अग्निपथ' या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा आणि 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जल्लाद' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

1976 मध्ये 'मृगया' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या मिथून दांना पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर 1993 मध्ये 'ताहादार कथा' या सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या आणि 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'स्वामी विवेकानंद' या सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या मिथून दांचा नक्षलवादी ते सिनेसृष्टीपर्यंतच्या प्रवासाविषयी..
 
बातम्या आणखी आहेत...