मुंबई - बिग बॉस चा 11 वा सिझन सुरू झाला आहे. शोच्या पहिल्याच दिवशी झालेल्या भांडणामुळे पुढचे तीन महिने काय पाहायला मिळणार याची झलक मिळाली आहे. एकिकडे भांडण तर दुसरीकडे मॉडेल अर्शी खानने पुन्हा एकदा तिच्या जुन्या अफेयरचा उल्लेख केला. इतर कंटेस्टंटबरोबर बोलताना अर्शीने पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीला प्रियकर म्हणून उल्लेख केला.
शाहीदला प्रियकर म्हणताच भाभीजी आवाक्..
- पहिल्याच एपिसोडमध्ये जेव्हा घरातील सर्व लोक बसून एकमेकांशी बोलत होते, तेव्हा अर्शी तिच्या सो-कोल्ड अफेयरबाबत सांगू लागली.
- त्यावेळी तिने शाहीदला 'मेरे मेहबूब' म्हटले. अर्शीचे हे बोलणे ऐकूण 'भाभीजी' शिल्पा शिंदे आवाक् झाली.
- शिल्पाने अर्शीकडून सर्वकाही जाणून घेण्यासाठी तिच्या शब्दांचा पुन्हा उल्लेखही केला, पण अर्शी त्याच्या पुढे काहीही बोलली नाही.
'बिग बॉस'मध्ये येण्यापूर्वी आफ्रिदीला केला होता कॉल
- एका एंटरटेनमेंट वेबसाइटने नुकताच हा दावा केला होता की, अर्शीने शोमध्ये जाण्यापूर्वी आफ्रिदीला अखेरचा फोन केला होता. पण त्याने फोन रिसिव्ह केला नाही.
- बोलणे झाले नाही म्हणून अर्शी नाराज होती. आफ्रिदीने मात्र कधीही अर्शीबरोबरचे नाते मान्य केले नाही.
आफ्रिदीच्या बाळाची आई बनण्याचा केला होता दावा
- 2015-16 मध्ये अर्शीने शाहीद आफ्रिदीच्या बाळाची आई बनणार असल्याचा दावा केला होता. पण हा केवळ पब्लिसिटी स्टंट होता.
- मार्च 2016 मध्ये टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने पाकला हरवले तेव्हा अर्शीने सोशल मीडियावर एक फोटो शेयर करून बॅक एक्सपोज केले होते.
- मॅच सुरू झाली तेव्हा तिने आफ्रिदीने शकत केले तर न्यूड होणार असे जाहीर केले होते. पण तसे झाले नाही.
पुडे वाचा, अर्शीच्या विरोधात निघाला होता फतवा..