कॅरोल ग्रेसियास.. हे नाव बहुधा फारशा लोकांना लक्षात असेलच असे नाही. कदाचित मॉडेंलिंग इंडस्ट्रीतील लोकांना तिचे नाव माहिती असेल. पण एक यशस्वी मॉडेल म्हणून ती या इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असते. सामान्य लोकांना सांगायचे झाले तर, अनेक वर्षांपर्वी जेव्हा 24 तास न्यूज चॅनेल्स सुरू होऊन फारसा वेळ झालेला नव्हता तेव्हा कॅरोलच्या एका बातमीने खळबळ उडाली होती. एका फॅशन शोमध्ये तिचा ड्रेस खाली घसरून तिची फजिती झाली होती. पण प्रोफेशनल मॉडेल असल्याने तिने अत्यंत खंबीरपणे तो क्षण सांभाळला. विशेष म्हणजे या प्रकारानंतरही तिने रॅम्पवॉक पूर्ण केला होता.
बऱ्याच दिवसांनंतर कॅरोल सध्या पुन्हा चर्चेत आहे. ते म्हणजे तिने नुकत्याचे केलेल्या रॅम्पवॉकसाठी. गौरांग शहाच्या आऊटफिट्ससाठी तिने रॅम्पवॉक केले. पण हे रॅम्पवॉक नेहमीप्रमाणे नव्हते, तर गर्भवती असल्याने तिने बेबी बंपसह रॅम्पवॉक केले.
गौरांगने कॅरोल गर्भवती असल्याचे माहिती असतानाही खास आऊटफिट तयार करून तिला शोमध्ये रॅम्पवॉक करायला लावले. त्यामुळे डिझायनरला हरकत नसेल तर मला काय, असे म्हणत कॅरोलनेही लगेचच तयारी दाखवली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कॅरोलचे Ramp Walkचे काही PHOTOS