आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलिंग करताना असा होता ऐशचा लूक, शाळेत असतानाच मिळाली होती पहिली संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - ऐश्वर्या राय आणि अनिल कपूरच्या 'फन्ने खा' चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले आहे. ऐश्वर्या राय ऐ दिल है मुश्किलनंतर अद्याप झळकलेली नाही. पण बॉलिवूडमध्ये एवढी वर्ष काम केलेल्या ऐश्वर्याने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली होती. त्या काळात तिचा लूकही आजच्या तुलनेत बराच वेगळा होता. 

9 व्या वर्गात असताना मिळाला पहिली ऑफर...
बालपणी आर्किटेक्ट बनण्याचे स्वप्न पाहणा-या ऐश्वर्याची रुची कालांतराने मॉडेलिंगमध्ये वाढू लागली. मॉडेलिंगची पहिली संधी तिला नवव्या वर्गात शिकत असताना मिळाली. कॅमलिन कंपनीसाठी ऐश्वर्याने पहिल्यांदा मॉडेलिंग केले होते. त्यानंतर कोक, फूजी आणि पेप्सी या ब्रॅण्डच्या जाहिरातींमध्ये तिने काम केले आणि सोबत शिक्षणसुद्धा सुरु ठेवले. ऐश्वर्या एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिने पेप्सी आणि कोक या दोन प्रतिस्पर्धी ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केले आहे.

1991मध्ये जिंकली होती सुपरमॉडेल कॉन्टेस्ट...
मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर ऐश्वर्याने 1991मध्ये सुपरमॉडेल कॉन्टेस्ट जिंकली होती. फोर्डद्वारा आयोजित ही स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर ऐश्वर्याला व्होग या आंतरराष्ट्रीय मॅगझिनच्या कव्हरपेजवर स्थान मिळाले होते. 1993 मध्ये अभिनेता आमिर खानसोबत पेप्सीच्या जाहिरातीत झळकल्यानंतर ऐश्वर्या चर्चित चेहरा बनली. 1994मध्ये मिस वर्ल्डचा खिताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याचे आयुष्यच पालटून गेले.

अभिनयापेक्षा मॉडेलिंग अधिक यशस्वी 
जाणकारांनुसार, सिनेमांपेक्षा ऐश्वर्याची जादू मॉडेलिंग क्षेत्रात जास्त चालली. मॉडेलिंगमुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता प्राप्त झाली. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्‍ड्सची ती ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनली. त्यामुळेच 2003 मध्ये तिला 'कान' या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दरवर्षी ऐश्वर्या कानच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत असते.
ऐश्वर्याचे एंडोर्समेंट्स..
कॅमलिन पेन्सिलपासून सुरु झालेला ऐश्वर्याचा प्रवास आजही यशस्वीपणे सुरु आहे. टाइटन वॉचेज, लॉन्जिस वॉचेज, लॉरियल, कोका-कोला, लॅक्मे कॉस्मेटिक्स, फिलिप्स, पामोलिव, लक्स, फूजी फिल्म्स, नक्षत्र डायमंड्स, कल्याण ज्वेलर्स, प्रेस्टीज यांसारख्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्ससाठी ऐश्वर्याने काम केले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, ऐश्वर्या रायचे मॉडेलिंग डेजचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...