आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : मॉडेलिंगच्या काळात अशी दिसायची लारा, पाहा तिचे काही Old Pics

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता रविवारी (16 एप्रिल) 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाबरोबरच आपल्या ग्लॅमरस अंदाजाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2000 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या लाराने 2003 मध्ये 'अंदाज' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 2011 मध्ये तिने टेनिसपटू महेश भूपतीबरोबर लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगी असून सायरा असे तिचे नाव आहे.

लाराचा जन्म 16 एप्रिल 1978 रोजी गाझियाबाद (उत्तर प्रदेश) मध्ये झाला. तिचे वडील हिंदू आणि आई अँग्लो इंडियन आहे.  1981 मध्ये लाराचे कुटुंब बंगळूरू येथे स्थायिक झाले. सेंट फ्रान्सिस झेव्हिअर गर्ल्स स्कूलमध्ये लाराने शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून तिने ग्रॅज्युएशन केले.

मिस युनिव्हर्सचा किताब 
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर लारा फॅशन जगताकडे वळली. फॅशन वर्ल्डमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची तिची इच्छा होती. ती तिने पूर्णदेखील केली. तिने सर्वात प्रथम ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेलचा किताब मिळवला. त्यानंतर लारा फेमिना मिस इंडिया आणि नंतर मिस युनिव्हर्स झाली. मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करणारी लारा दुसरी भारतीय महिला आहे.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री 
2000 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर लाराने 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 'अंदाज' हा तिचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती. या सिनेमासाठी लाराने सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. 'अंदाज'नंतर लारा दत्ताने अनेक सिनेमे केले, त्यापैकी काही हिट ठरले. लाराच्या हिट सिनेमांमध्ये 'मस्ती', 'नो एन्ट्री', 'पार्टनर', 'हाऊसफूल', 'ब्लू'सह आणखी काही सिनेमांचा समावेश आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, लाराचे मॉडेलिंगच्या काळातील काही PHOTOS.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...