आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटांपासून दूर मुलांच्या पालनपोषणात बिझी आहे 'मोहब्बतें गर्ल', या मॉडेलशी केले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2003 साली ब्लॉकबस्टर 'मोहब्बतें' चित्रपटातील अभिनेत्री प्रिती झंगियानी 37 वर्षाची झाली आहे. 18 ऑगस्ट 1980 रोजी मुंबईतील सिंधी कुटुंबात प्रितीचा जन्म झाला. प्रिती सर्वप्रथम राजश्री प्रोडक्शनच्या 'ये है प्रेम' मध्ये अॅक्टर अब्बाससोबत दिसली होती. त्यानंतर तिचे 'छुई मुई सी तुम लगती हो' आणि 'कुड़ी जच गई' हे गाणे फारच लोकप्रिय झाले.  यानंतर प्रितीने निरमा साबण आणि इतर काही जाहिरातीही केल्या. 2008 साली प्रितीने केले मॉडेलसोबत लग्न..
 
- प्रितीने 23 मार्च, 2008 साली मॉडेल आणि अभिनेता प्रवीण डबासबरोबर लग्न केले. 11 एप्रिल 2011 रोजी प्रितीने पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचे नाव जयवीर आहे. 27 सप्टेंबर 2016 ला प्रिती दुसऱ्यांदा आई बनली. बाळाचे नाव देव असे ठेवण्यात आले. प्रिती सध्या कुटुंबासोबत बांद्रा येथे राहते. प्रिती सध्या चित्रपटांपासून दूर आहे. 
- प्रवीण डबास मीरा नायरच्या मान्सून वेडींग या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. त्याने दिल्ली येथील हंसराज कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. 
- अभिनेताव्यतिरीक्त प्रवीण स्कुबा ड्रायव्हिंगही करतो. त्याला अंडरवॉटर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचीही आवड आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, प्रवीणअगोदर याच्यासोबत एन्गेज्ड होती प्रिती..
बातम्या आणखी आहेत...