आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Famous Controversies Love Stories In Bollywood

महेश-परवीन, सलमान-ऐश्वर्या, अधू-या राहिल्या बॉलिवूडच्या या चर्चेतील Love Stories

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रसिध्द दिग्दर्शक महेश भट्ट 20 सप्टेंबरला 66 वर्षांचे झाले. 20 सप्टेंबर 1948ला गुजरातमध्ये जन्मलेल्या मगेश भट्ट यांनी 1947मध्ये 'मंजिले और भी है' सिनेमातून करिअरला सुरुवात केली. महेश यांनी 'अर्थी', 'सारांश', 'डॅडी', 'दिल है की मानता नही', 'सडक' आणि 'जुनून'सारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. मागील 17 वर्षांपासून निर्माता आणि लेखक म्हणून काम करत आहेत.
महेश भट्ट नेहमी आपल्या बोल्ड आणि वादग्रस्त सिनेमांमुळे चर्चेत राहतात. परंतु त्यांचे खासगी आयुष्यसुध्दा खूप रंजक आहे. महेश यांनी दोन लग्ने केली आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव किरण भट्ट होते आणि दुस-या पत्नीचे नाव सोनी राजदान. परंतु या दोन्ही वैवाहिक आयुष्यापेक्षा जास्त महेश परवीन बाबीसोबतच्या अफेअरने जास्त चर्चेत राहिले. त्यांचे हे विवाहबाह्य नाते होते.
करिअरमध्ये लोकप्रिय होत असताना केले महेश यांच्यावर प्रेम-
परवीन आपल्या अभिनया करिअरमध्ये टॉपवर होती, तेव्हाच महेश यांच्या तिच्या जीव जडला होता. 1977मध्ये दोघांचे प्रेम खूप पुढे निघून गेले होते. त्यावेळी महेश विवाहित होते तर परवीन कबीर बेदीच्या प्रेमातून नुकतील बाहेर पडत होती. गतकाळातील सुपरस्टार परवीन आणि महेश लिव्ह-इनमध्ये राहू लागले. परंतु या प्रेमळ कहाणीचा अंत दु:खद झाला. त्यानंतर परवीनची तब्येत खालावली.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, परवीन मानसिक रुपाने आजारी पडली होती, तिच्या आजारावर काहीच उपचार नव्हता. महेश यांनी तिच्या अमेरिकेत उपचार केले, मात्र ती ठिक झाली नाही. या अपयशाने महेश परवीनला सोडून आपल्या पत्नीकडे निघून गेले. त्यानंतर महेश यांच्यावर परवीनच्या स्टारडमचा वापर केल्याचा आरोप लागला होता. त्याचदरम्यान महेश यांनी 'अर्थ' सिनेमा लिहण्यास सुरु केला होता, हा सिनेमा त्यांच्या खासगी आयुष्याशी प्रेरित होता.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रेमकथा आहेत, ज्या चर्चेत राहिल्या मात्र त्यात यश आले नाही. अशाच काही लव्हस्टोरीविषयी divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे.
ऐश्वर्या राय आणि सलमान खान-
'हम दिल दे चुके सनम'मध्ये पहिल्यांदा आणि शेवटची दिसलेली जोडी इंडस्ट्रीची मोस्ट चार्मिंग जोडी मानली गेली होती. दोघांचे नाते अशाप्रकारे तुटले, की नंतर त्यांना एकमेकांना कधीच पाहिले नाही. सलमानच्या ओव्हर इमोशनल असल्याने ऐश्वर्या या नात्यातून माघार घेतली आणि दोघांच्या नात्यात दरी आल्याचे सांगितले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही चर्चेतील लव्हस्टोरीविषयी...