आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाप्रकारे हॉलिडे एन्जॉय करतेय TV ची नागीण, लवकरच बनणार अक्षयची हिरोईन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अॅक्ट्रेस मौनी रॉय सध्या शिकागोमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिच्याबरोबर तिचे काही फ्रेंड्सदेखिल आहेत. तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये ती शिकागोमधील सुंदर निसर्गाचा आनंद घेताना दिसतेय. तर काही फोटोंमध्ये ती तिची नवी हेअरस्टाइल सर्वांना दाखवत असल्याचे दिसत आहे. तिने काही दिवसांपूर्वीच केसांना रेड कलर दिला आहे. त्याशिवाय इतर काही फोटोंमध्येही तिचा स्टनिंग लूक दिसत आहे. मौनी सध्या 'नागिण 2' मध्ये मुख्य भूमिकेत आहे. पण हा शो 23 जूननंतर ऑफ एअर होणार आहे. काही दिवसांतच या मालिकेचा तिसरा सिझन सुरू होणार आहे. मौनी त्यातही असणार आहे. त्यामुळे तिने सध्या ब्रेक घेतला आहे. एवढेच नाही, लवकरच अक्षय कुमारच्या अपकमिंग चित्रपटातही मौनी झळकणार आहे. सुत्रांच्या मते 'गोल्ड' मध्ये ती अक्षयबरोबर झळकण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अक्षयकुमार हॉकी कोचची भूमिका करणार आहे. मात्र मौनीच्या रोलबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मौनीचे आणखी 5 फोटोज..
बातम्या आणखी आहेत...