आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फिल्ममध्ये आहे सेक्स सीन्सचा भडीमार, जाणून घ्या सेन्सॉर बोर्डाने का दाखवला नाही हिरवा कंदील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता प्रकाश झा यांच्या निर्मिती अंतर्गत बनलेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखवला नाही. अलीकडेच या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग सेन्सॉर बोर्डासाठी ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगनंतर केवळ हा सिनेमा स्त्रीप्रधान असल्याने यास प्रमाणपत्र देण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव यांनी केले आहे. 
 
दिली अनेक कारणे...
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा  सिनेमा स्त्रीप्रधान आहे. या सिनेमाला प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यासाठी बोर्डाने अनेक कारणे दिली आहेत. यात सामान्य आयुष्यापेक्षा कितीतरी अधिक, अवास्तव अशा कल्पना रंगवलेल्या आहेत. तसेच, यात विवादास्पद प्रणयदृश्य, शिवीगाळ, ऑडिओ पॉर्नोग्राफी आणि समाजाच्या काही अतिसंवेदनशील भागाचा संदर्भ आहे. यामुळे 1(a), 2(vii), 2(ix), 2(x), 2(xi), 2(xii) and 3(i) या मार्गदर्शन सूचनांतर्गत या सिनेमास प्रमाणपत्र नाकारण्यात येत असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. 

प्रकाश झांनी व्यक्त केली नाराजी.. 
सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर झा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, खरे तर एक देश म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यास आपणास प्रोत्साहन द्यायला हवे. पण सेन्सॉर बोर्डाने याच्या उलट पाऊल उचलले आहे. गुंतागुंतीच्या मुद्यांवर आधारित सिनेमे बनवणा-या निर्मात्यांना मागे ओढण्याचा हा प्रकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

काय म्हणाली सिनेमाची दिग्दर्शिका... 
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या स्त्रीप्रधान सिनेमात कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शहा, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यात एक महिला सामाजिक रुढीवादी बेडी तोडून पित्तृसत्ताक समाजाला आव्हान देते. माझ्या मते याच कारणामुळे ते चित्रपटाला प्रमाणपत्र देत नाही आहेत. या चित्रपटाची दिग्दर्शक असल्याने मी या चित्रपटाचे समर्थन करते आणि त्यासाठी मी शेवटपर्यंत लढेन, असे दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव हिने म्हटले आहे 
 
यापूर्वी अनेक सिनेमांना बसला आहे फटका..
खरं तर एखाद्या सिनेमातून काही सीन्स वगळण्यात आल्याची किंवा सिनेमाला प्रमाणपत्र न देण्याची हीपहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही अनेक सिनेमांना याचा फटका बसलेला आहे. काही सिनेमांतून सेन्सॉरने सीन्स हटवले तर काही सिनेमे विविध ठिकाणी बॅन करण्यात आले. अशाच काही सिनेमांवर एक नजर टाकुयात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच काही सिनेमांविषयी...  
बातम्या आणखी आहेत...