आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाकारलेल्या या चित्रपटांचे यश पाहून ऐश्वर्यालाही नक्की वाटला असेल हेवा, मोठी आहे यादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच नव्या सिनेमामध्ये पडद्यावर झळकणार असल्याचे समोर आले आहे. ऐश्वर्याने यापूर्वी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. परंतु तिच्या चाहत्यांना कदाचित माहीत नसेल, की तिने अनेक सुपरहिट सिनेमे धुडकावूनसुद्धा लावले आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर विक्रम रचले आहेत. करण जोहरचा 'कुछ कुछ होता है' आणि 'कभी खुशी कभी गम'सारखे सिनेमे आधी ऐश्वर्याला ऑफर झाले होते. परंतु काही कारणास्तव तिने या सिनेमांत काम करण्यास नकार दिला.
 
का नाकारला होता करण जोहरचा सिनेमा...
ऐश्वर्याने एका प्रसिध्द वर्तमानपत्रासोबत बोलताना सांगितले, की तिने करण जोहरचा सिनेमा नाकारला होता. ऐश्वर्याने दिलेल्या माहितीनुसार, तिला 'कुछ कुछ होता है' सिनेमा ऑफर झाला तेव्हा ती अमेरिकेत 'आ अब लौट चले' सिनेमाच्या 40 दिवसांच्या शूटिंग शेड्यूलमध्ये बिझी होती. दिग्दर्शक चिंटू अंकलचा (ऋषी कपूर) तो पहिला सिनेमा होता. ऐश्वर्या त्यांची मोठी फॅन आहे. त्यांच्यासोबत काम करणे ती मिस करू शकत नव्हती. त्यावेळी करणने तिला 'कभी खुशी कभी गम'च्या कलाकार आणि कथेविषयी सांगितले होते. परंतु आम्ही एकत्र काम करू शकलो नाहीत. तो त्याच्या अनेक सिनेमांच्या कथा मला ऐकवत असतो. आम्ही एका कुटुंबातील सदस्यासारखे आहोत, असे ऐश्वर्या म्हणाली. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या ऐश्वर्याने नाकारलेल्या चित्रपटांबाबत.. 
बातम्या आणखी आहेत...