आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता दोन मुलींची आई आहे Mr. India ची छोटी टिना, एवढा बदलला लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटात चिमुरडीच्या रुपात दिसलेली हुजान सध्या अशी दिसते. - Divya Marathi
चित्रपटात चिमुरडीच्या रुपात दिसलेली हुजान सध्या अशी दिसते.
मुंबई - अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या मिस्टर इंडिया चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1987 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातून अनिल कपूर, श्रीदेवी, अमरीश पुरी यांच्यासह आफताब शिवदासानीपर्यंत सर्वांच्याच भूमिकांनी प्रेक्षकांवर आपली छाप सोडली. चित्रपटातील असेच आणखी एक पात्र होते ते म्हणजे 'टीना' या चिमुरडीचे. बॉम्ब ब्लास्टमध्ये तिचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात टिनाची भूमिका हुजान खोदैजी हिने केली होती. हुजान आता 36 वर्षांची झाली असून तिला दोन मुली आहेत. ही भूमिका केली तेव्हा ती 6 वर्षांची होती. 

आता करतेय हे काम.. 
- हुजान सध्या एका अॅड कंपनीत अॅडव्हरटायजिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे. 
- चित्रपटात काम करण्याबाबत हुजान सांगते, कास्टींग डायरेक्टर माझ्या वडिलांचे मित्र होते. मी ऑडिशनसाठी गेले आणि माझी निवड झाली. 
- चित्रपटाच्या शुटिंगसाठी हुजान मद्रासला गेली. त्यानंतर तिने अनेक जाहिराती शूट केल्या. पण चित्रपटात भूमिका केली नाही. 
- हुजान सांगते, मला आजही लोक त्या भूमिकेसाठी ओळखतात याने आनंद वाटतो. पण तेव्हा लहान टिनाची भूमिका करणारी मी आता आईच्या भूमिकेत असून कुटुंबातील सर्वात मोठी सदस्य आहे. 

हुजानचे रडण्याचे सीन होते खरे 
- चित्रपटात हुजानचे रडणारे अनेक सीन्स आहेत. हुजानने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते, चित्रपटात माझे रडण्याचे जेवढे सीन दाखवण्यात आले आहेत, ते सर्व रियल आहेत. 
- शुटिंगदरम्यान पाठ करण्यासाठी खूप सारे डायलॉग्ज असलेले पेपर दिले होते. ते पाहून मी रडायला सुरुवात केली. त्याचवेळी माझे रडणारे सर्व सीन शूट झाले होते. 
- चित्रपटात हुजानसह चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करणारे आफताब शिवदासानी आणि अहमद खान अजूनही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण हुजान त्यानंतर चित्रपटात झळकली नाही. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हुजान खोदैजीचे 6 PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...