आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amyra Dastur Is 15 Years Younger Then Her Co Star

PHOTOS: \'मिस्टर एक्स\' इमरानपेक्षा 15 वर्षांनी लहान आहे त्याची को-स्टार अमायरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमायरा दस्तूर)
मुंबईः 'इशक' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या अमायरा दस्तूरचा दुसरा सिनेमा 'मिस्टर एक्स' आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या सिनेमात अमायराने इमरान हाश्मीच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. 21 वर्षीय अमायरा तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षे मोठ्या असलेल्या इमरानसोबत सिल्व्हर स्क्रिनवर रोमान्स करताना दिसणार आहे. 36 वर्षीय इमरानने सिनेमात रघू हे पात्र साकारले असून त्याच्या अदृश्य होण्याच्या शक्तीवर सिनेमाचे कथानक आधारलेले आहे.
7 मे 1993 रोजी जन्मेलेली अमायरा दस्तूर मुळची मुंबईची आहे. येथेच तिने आपले शिक्षण पूर्ण केले. पारसी कुटुंबातील असलेल्या अमायराने वयाच्या 13 वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले होते. अनेक जाहिरातींमध्ये ती झळकली. 2013 मध्ये तिला मनीष तिवारींच्या 'इशक' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. या सिनेमात प्रतीक बब्बर तिचा को-स्टार होता. 'इशक'नंतर अमायराने 'अनजान' (2015) या तामिळ सिनेमात काम केले होते आणि आता ती सीरिअल किसर इमरान हाश्मीची लेडी लव्ह बनून 'मिस्टर एक्स'मध्ये दिसणार आहे.
भट कॅम्पच्या 'मिस्टर एक्स'मध्ये कशी एन्ट्री मिळाली? हा प्रश्न तिला विचारला असता, ती म्हणाली, ''संधी मिळाली नाही, ती मी मिळवली. या सिनेमासाठी मी त्यांना अप्रोच केले होते. माझी एक मैत्रीण विक्रम भटची चांगली मैत्रीण आहे. एकेदिवशी तिच्याकडूनच मला विक्रम भट त्यांच्या नवीन सिनेमासाठी अभिनेत्रीच्या शोधात असल्याचे समजले. मी लगेचच त्यांची भेट घेतली. मात्र पहिल्याच दिवशी त्यांची आणि माझी भेट झाली नाही. बरेच दिवस त्यांच्या ऑफिसच्या चकरा घालाव्या लागल्या. त्यानंतर ऑडीशन देऊन या सिनेमासाठी माझी निवड झाली.''
आपल्या दुस-याच हिंदी सिनेमात अमायराला बी टाऊनमध्ये सीरिअल किसर म्हणून ओळखल्या जाणा-या इमरान हाश्मीसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली. इमरानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना अमायरा म्हणाली, "मी इमरान हाश्मीचे जास्त सिनेमे पाहिले नव्हते. मात्र त्याच्याविषयी बरेच काही ऐकले होते. त्याच्या सीरिअल किसर इमेजमुळे खरं तर मी घाबरले होते. शिवाय माझ्या कुटुंबीयांनाकडूनही या सिनेमात काम करण्याची परवानगी मिळवायची होती. खरं सांगायचे तर इमरानसोबत काम करताना माझी घाबरगुंडी उडाली होती. या क्षेत्रात नवीन असल्याने दिग्दर्शकाला जास्त प्रश्नही विचारु शकत नव्हते. मात्र विक्रम सरांना कळले, की इमरानचे नाव ऐकून मी कम्फर्ट झोनमध्ये नाहीये. त्यांनी माझा गैरसमज दूर केला. त्यांनी सांगितले, की ते असा एक सिनेमा बनवत आहेत, जो प्रेक्षक आपल्या कुटुंबासोबत बसून बघू शकतील. हॉट आणि अॅडल्ट सिनेमा बनवण्याचा आमचा प्रयत्न नाहीये. विक्रम सरांचे हे म्हणणे ऐकल्यानंतर मला कळले, की मोठी संधी मला मिळाली आहे. पहिल्यांदाच मला अनुभवी अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली."
सुरुवातीला अमायरा इमरानसोबत काम करताना कम्फर्टेबल नव्हती. मात्र वेळेनुसार दोघांची उत्तम ट्युनिंग जुळली. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान इमरानने तिला सेटवर बरीच मदत केली आणि तिला काम करताना कम्फर्टेबल केले.
इमरान आणि अमायराची ऑफस्क्रिन केमिस्ट्री उत्तम जुळली. मात्र आता त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना किती भावणार, हे येणारा काळच सांगेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'मिस्टर एक्स' फेम अभिनेत्री अमायरा दस्तूरचे खास PHOTOS...