आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींची मुलगी ईशा बॉलिवूडमध्ये करतेय एंट्री, अक्षय कुमार असेल लीड रोलमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही दिवसांपूर्वी जियोच्या बोर्ड मीटींगमध्ये छाप पाडणारी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. ती चित्रपटात अॅक्टींग नव्हे तर निर्मिती करणार आहे. करण जोहरबरोबर ती या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

अक्षय असेल लीड रोलमध्ये.. 
- हाती येत असलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे नाव 'बॅटल ऑफ सारागढी' आहे. 
- हा चित्रपट करण जोहर आणी सलमानबरोबर प्रोड्युस करणार होता. पण काही कारणांमुळे तसे झाले नाही. 
- रिपोर्ट्सनुसार या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार आहे. 
- काही दिवसांपूर्वी करणच्या घरी अक्षय आणि ईशा अंबानी यांच्या मिटींग झाली होती. तेव्हा ईशाने या प्रोजेक्टसाठी होकार दिला होता. 

29 ऑगस्टला झाली मिटींग 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार करण जोहर, अक्षय कुमार आणि रेश्मा शेट्टी यांची फायनल मिटींग 29 ऑगस्टला अक्षयच्या घरी झाली होती. 
- बॅटल ऑफ सारागढी या विषयावर करण-अक्षय बरोबरच राजकुमार संतोषी आणि अजय देवगणही चित्रपट बनवत आहेत. 
- चित्रपटात अजय 36 शीख रेजिमेंटच्या 21 जवानांबरोबर दहा हजार अफगाणी शिपायांशी लढताना दिसेल. 
- तसेच सारागढीचा किल्ला जिंकण्याची कहाणी लोकांसमोर यासी हा उद्देशही आहे. 

सारागढी युद्धाचे वैशिष्ट्य.. 
- सारागढी युद्ध ही जागतिक इतिहासातील एक मुख्य घटना आहे. यात 21 शीख सैनिकांनी सारागढीचा किल्ला वाचवण्यासाठी पठाणांबरोबर अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला होता. 
- 12 सप्टेंबर 1897 रोजी ही लढाई लढली गेली होती. 
- 36 व्या शीख रेजिमेंटमध्ये फक्त केशधारी शिखांना भर्ती केले जाते. हे संपूर्ण बटालियन केशधारी शिखांचे होते. 
- या सर्वांना इंडियन ऑर्डन ऑफ मेरिटने गौरवण्यात आले होते. 
- 12 सप्टेंबर 1897 ला शिखलँड धरतीवर झालेले हे युद्ध जगातील पाच सर्वात महान युद्धांपैकी एक होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ईशा अंबानीचे काही PHOTOS.. 
 
बातम्या आणखी आहेत...