Home »Gossip» Mumtaz To Parveen Babi Shashi Kapoor Actresses, Shashi Kapoor Pass Away

शशी कपूरच्या 8 अॅक्ट्रेसेस, कुणाला झाला कॅन्सर तर कुणी आता नाही या जगात

दिव्य मराठी वेब टीम | Dec 06, 2017, 00:31 AM IST

  • शशी कपूरसोबत मुमताज आणि नंदा

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर आता आपल्यात नाहीत. 4 डिसेंबर रोजी वयाच्या 79 वर्षी त्यांनी या जगाला कायमचे अलविदा म्हटले आहे. फिल्मी करिअरमध्ये शशी कपूर यांनी अनेक हिट चित्रपट दिले. अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केले. त्यांच्यासोबत झळकलेल्या काही अभिनेत्री आता या जगात नाहीत. एक अभिनेत्री कॅन्सरशी झुंज देत आहे तर काही जणी आता सिनेसृष्टीपासून दूर गेल्या आहेत. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या अभिनेत्रींविषयी सांगत आहोत.

मुमताजला आहे ब्रेस्ट कॅन्सर...

शशी कपूर आणि मुमताज यांनी 'प्यार किए जा' (1966), 'चोर मचाए शोर' (1974), 'प्रेम कहानी' (1975) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मुमताज यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे. 1990 मध्ये आलेल्या 'आंधियां' या चित्रपटात मुमताज अखेरच्या झळकल्या होत्या.

आता या जगात नाही नंदा...

शशी कपूर यांच्यासोबत झळकलेली अभिनेत्री नंदा आता या जगात नाही. 25 मार्च 2014 रोजी नंदाचे निधन झाले होते. या जोडीने 'चार दीवारी' (1961), 'मोहब्बत इसको कहते हैं' (1965), 'जब जब फूल खिले' (1965), 'नींद हमारी चैन तुम्हारा' (1966), 'जुआरी' (1968), 'राजा साहेब' (1969), 'रूठा ना करो' (1970) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, शशी कपूर यांच्यासोबत झळकलेल्या आणखी काही अभिनेत्रींविषयी..

Next Article

Recommended