आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्त तुरुंगाबाहेर येण्याची प्रतिक्षा, 'मुन्नाभाई 3' सिनेमा नक्की होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'पीके'ला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर राजकुमार हिराणी नवीन प्रोजेक्टच्या कामाला लागले आहेत. त्यांचा एक प्रोजेक्ट हा संजय दत्तची बायोपिक असून अभिनेता रणबीर कपूर त्यामध्ये मेन लीडमध्ये असणारेय. शिवाय 'मुन्नाभाई' सीरिजवरसुद्धा हिराणी कामाला लागले आहेत.
'मुन्नाभाई' सीरिजचे दोन सिनेमे खूप गाजले होते. अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्या जोडगोळीने 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि त्याच्या सिक्वेलमधून धुमाकूळ घातला होता. आता 'मुन्नाभाई'च्या तिसऱ्या भागाची तयारी पूर्ण झाली असून फक्त संजय दत्त तुरुंगाबाहेर येण्याची वाट पाहत असल्याचं अर्शद वारसीने सांगितलं.

'मुन्नाभाई 3' ची स्क्रिप्ट तयार आहे. त्यामुळे हा सिनेमा होणार हे नक्की. आता फक्त संजूबाबा बाहेर येण्याची वाट पाहतोय. त्याने थोडा आराम करावा, मग लगेच आम्ही चित्रपटाचं शूटिंग सुरु करु, असं अर्शद वारसीने सांगितलं.

संजय दत्त सध्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असून काहीच दिवसांपूर्वी त्याने पॅरोलसाठी अर्ज केला आहे. संजय दत्तला ठोठावलेल्या 42 महिन्यांच्या शिक्षेपैकी 25 महिने पूर्ण झाले आहेत. डिसेंबरपर्यंत संजय दत्त तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.