आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहित असूनदेखील 17 वर्षांनी लहान अॅक्टरसोबत होते टायगरच्या आईचे अफेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(L) साहिल खानसोबत आयशा श्रॉफ, खाली फोटोत - साहिलसोबत आयशा-जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ - Divya Marathi
(L) साहिल खानसोबत आयशा श्रॉफ, खाली फोटोत - साहिलसोबत आयशा-जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ
मुंबई: 21 जुलै रोजी टायगर श्रॉफ स्टारर 'मुन्ना माइकल' हा सिनेमा रिलीज झाला आहे. टायगरसोबत अभिनेत्री निधी अग्रवाल मोठ्या पडद्यावर झळकली आहे. टायगरचे वडील जॅकी श्रॉफ अभिनेते असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण टायगरची आई आयशा श्रॉफसुद्धा एकेकाळी अभिनेत्री आणि मॉडेल होती, हे फारसे कुणाला ठाऊक नसावे. 'ग्रहण' (2001) या सिनेमात आयशा शेवटची झळकली होती. आता ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. 
 
17 वर्षांनी लहान अॅक्टरसोबत होते आयशा श्रॉफचे अफेअर...
- 57 वर्षीय आयशाचे नाव 40 वर्षीय बॉलिवूड अभिनेता साहिल खानसोबत जुळले होते.
- विवाहित आयशा आणि साहिलचे अफेअर बरेच गाजले होते. स्वतः साहिलने आयशा श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती.
- आयशाने मात्र ही गोष्ट नाकारली होती. 
 
आयशाने साहिल म्हटले होते 'गे' 
- साहिलने आयशासोबतच्या अफेअरची सार्वजनिकरित्या कबुली देऊन म्हटले होते, की आता आमचे ब्रेकअप झाले आहे. त्यामुळे आयशाने त्याला दिलेले महागडे गिफ्ट्स आणि हॉलिडेजवर केलेल्या खर्चाचे पैसे परत मागितले आहेत.
- साहिलच्या या दाव्याचे खंडन करून आयशाने त्याला 'गे' म्हटले होते. 
- साहिल एक 'समलैंगिक पुरुष आहे', त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिल्याचे आयशाने म्हटले होते.
- आयशाच्या सांगण्यानुसार, साहिलच्या पत्नीने त्याला एका व्यक्तीसोबत आपत्तीजनक अवस्थेत पाहिले होते. 
 
आयशाने  साहिलवर लावला होता फसवणुकीचा आरोप...  
- आयशा आणि साहिल जुने मित्र होते.
- आयशाचा आरोप होता, की 2009 साली तिने साहिलसोबत सायबर सिक्युरिटी कंपनी आणि एक प्रॉडक्शन हाऊस सुरु केले होते.
- ही सायबर सिक्युरिटी कंपनी लवकच बंद पडली, तर प्रॉडक्शन हाऊससुद्धा तोट्यात गेले.
- आयशाने म्हटले होते, की जेव्हा तिने साहिलकडे पैशांचा हिशेब मागितला तेव्हा त्याने तो देण्यास नकार दिला होता.
- - आयशाने साहिलवर 8 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावला होता. 
- नोव्हेंबर 2014 मध्ये आयशाने साहिलविरोधात निनावी नंबरवरुन धमकीवजा फोन केल्याची तक्रार दाखल केली होती.  

पुढील स्लाईड्सवर वाचा, आयशा आणि साहिलशी निगडीत आणखी काही गोष्टी आणि बघा PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...