एन्टरटेन्मेंट डेस्कः पुढील वर्षी
आपण बोहल्यावर चढणार असल्याची आनंदाची बातमी बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगने खुद्द आपल्या चाहत्यांना दिली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘सा रे ग म प’ या ‘रिअलिटी शो’च्या ‘वेडिंग स्पेशल’ भागादरम्यान मिकाने ही घोषणा केली. या शोमध्ये तो परीक्षकाची भूमिका बजावत आहे. हे खरे असल्याचे कबूल करत, सर्व परीक्षकांनी आपापले वैवाहिक जीवनातील अनुभव कथन केले, यातून प्रेरणा मिळाल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे तो म्हणाला. कोणासोबत तरी आयुष्याचे क्षण व्यतित करण्याची वेळ आली असल्याचे आपल्याला वाटत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. पुढील वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता जास्त वाट पाहावी लागणार नसल्याचेदेखील तो म्हणाला. अभिनेत्री उर्वली रौतेलासोबत मिकाचे सूत जुळल्याचे अनेक दिवसांपासून चर्चा आहे. त्यामुळे त्याची होणारी पत्नी उर्वशीच तर नाही ना, असा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
39 वर्षांचा आहे मिका सिंग
'शेक दैट बूटी..', 'ए गणपत...चल दारू ला', 'बिट्टू सबकी लेगा रे...', 'इश्क की मां की', 'सारी दुनिया मेरे इस पे' यांसारख्या कॉन्ट्रोव्हर्शिअल गाण्यांना स्वरबद्ध करुन आपला बिनधास्तपणा दाखवणारा आणि 'इब्ने-बतूता', 'ढिंका चिका', 'बन गया कुत्ता' आणि 'दिल में बजी गिटार' यांसारख्या गाण्यांना आपला अन-कन्वेंशनल आवाज देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेणारा गायक मिका सिंग 39 वर्षांचा आहे. तो इंडस्ट्रीतील अशा गायकांपैकी एक आहे, ज्याचे एक गाणे सिनेमाच्या यशाला मोठा हातभार लावत असते. मस्तमौला अंदाज, अन-कन्वेंशनल आवाज आणि वादविवादांशी जुने नाते, हीच कदाचित मिकाची खरी ओळख आहे. मिका कितीही वादात अडकला असला तरी त्याची लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही.
खरे नाव अमरीक सिंग
10 जून 1977 रोजी पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे जन्मलेल्या मिकाचे खरे नाव अमरीक सिंग आहे. मात्र बॉलिवूडमध्ये मिका या नावाने तो प्रसिद्ध आहे. मिका प्रसिद्ध गायक दलेर मेंहदीचा धाकटा भाऊ आहे.
लोक तोंडही बघणे नव्हते करत पसंत
आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत मिकाने इंडस्ट्रीत गायक म्हणून स्वतःची वेगळी ओळख नर्माण केली. बॉलिवूडमध्ये आज कॉन्ट्रोव्हर्सी किंग मिका सिंगला मोठी मागणी आहे. एका काळ असा होता, जेव्हा लोक त्याचे तोंड बघणेही पसंत करत नव्हते. मात्र मिकाने आपल्या आवाजाच्या बळावर स्वतःची ही इमेज पुसून काढली.
या पॅकेजमधून जाणून घेऊयात मिकाच्या इंडस्ट्रीतील स्ट्रगलसोबतच कोणकोणत्या वादांमुळे तो चर्चेत राहिला... पुढील स्लाईड्समध्ये वाचा, मिका सिंगशी निगडीत वाद...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)