आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mystery : सिंगल असल्याचे सांगणारी मल्लिका आहे विवाहित, एका मुलाची आई!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मल्लिका शेरावत आणि करण सिंग गिल. - Divya Marathi
मल्लिका शेरावत आणि करण सिंग गिल.
मुंबई - मल्लिका शेरावतचा एक लहानपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मल्लिकाने स्वतःच हा फोटो अपलोड केला आहे. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर ती मल्लिकाच असेल यावर विश्वास बसत नाही. पण फोटो प्रमाणेच मल्लिकाच्या जीवनातीलही अनेक बाबी अजूनही गूढ आहेत. कारण तिच्या लग्नाबाबतचही मीडियामध्ये नेहमी बातम्या येत असतात.

एका मुलाची आई..
मल्लिका ती सिंगल असल्याचे सांगते. पण 2000 साली तिचे लग्न करण सिंग गिल याच्याशी झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांचे नाते सुमारे वर्षभर टिकले. त्यानंतर चित्रपटांत काम करण्यासाठी मल्लिका हरियाणा सोडून मुंबईत आली आणि इथेच स्थायिक झाली. मल्लिकाला एक मुलगा असल्याच्याही अनेक चर्चा आहेत. पण सत्य काय आहे हे कोणालाही माहिती नाही. मल्लिका तर लग्न झाल्याचेच मान्य करत नाही, तर मग मुलगा असल्याचे मान्य करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

वयाबाबतही सस्पेन्स..
मल्लिका तिचे वय बरेच कमी असल्याचे सांगते. पण रेकॉर्ड्सनुसार तिचे वय 39 पेक्षा जास्त आहे. मल्लिकाचा जन्म 24 ऑक्टोबर 1976 ला झाला होता. हरियाणाच्या रोहतकमधील एका जाट कुटुंबात तिचा जन्म झाला होता. तिचे खरे नाव रिमा लांबा आहे. चित्रपटात येण्यापूर्वी ती एअर होस्टेस होती. मात्र मल्लिकाने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटांत येण्यापूर्वी तिने कोणतेही काम केलेले नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहू शकता, मल्लिकाचे काही रेयर PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...