आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 कोटी खर्चून झाले नागार्जुनच्या मुलाचे लग्न, आता 40 दिवस साजरा करणार Honeymoon

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नाच्या विधी दरम्यान नागा चैतन्य आणि समांथा रूथ. - Divya Marathi
लग्नाच्या विधी दरम्यान नागा चैतन्य आणि समांथा रूथ.
मुंबई - नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अॅक्ट्रेस समांथा रूथ शुक्रवारी रात्री (6 ऑक्टोबर) लग्नाच्या बेडीत अडकले. दोघांचे लग्न गोल्यातील हॉटेल 'W' मध्ये झाले. नागार्जुनने जवळपास 1 वाजता लग्नाचे फोटो ट्विटरवर शेयर करत याबाबत माहिती दिली. मेंदी सेरेमनी दुपारी 3 वाजता सुरू झाली होती. तर हिंदु पद्धतीने रात्री 11.30 वाजता लग्न झाले. समांथाने यावेळी नागा चैतन्यच्या आजीची साडी परिधान केली होती. डिझायनर क्रेशा बजाजने या साडीला थोडा मॉडर्न टच दिला होता. तर नागा चैतन्य व्हाइट सिल्क धोती-कुर्तामध्ये होता. 

खर्च 10 कोटी.. 
- रिपोर्ट्सनुसार दोन दिवसांच्या या लग्नावर जवळपास 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 
- नागार्जुन सहसा मिशांच्या लूकमध्ये दिसत असतो. पण मुलाच्या लग्नात त्याचा विना मिशितील लूक पाहायला मिळाला. 
- चैतन्य आणि समांथाच्या लग्नात दग्गुबती फॅमिली, व्यंकटेश, सुरेश बाबू, राहुल रविन्द्रन, वाइफ उपासनासह रामचरण तेजा, वेन्नेला किशोर, सुशांथ, अदिवी सेशसह अेक सेलेब्स उपस्थित होते. 

40 दिवसांचा हनिमून प्लान... 
- समांथा आणि नागा चैतन्य 40 दिवसांच्या हनिमूनवर जाणार आहेत. 
- हा काळ वाढून दोन महिन्यांपर्यंत जाऊ शकतो अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. 
- समांथा आणि नागा दोघांनाही फिरायला फार आवडते. त्यामुळे लग्नानंतर जगभरात फिरण्याची संधी त्यांना हातची जाऊ द्यायची नाही. 
- हनिमूनचे जास्तीत जास्त दिवस न्यूयॉर्कमध्ये राहिल्यानतर हे कपल भारतात परतणार आहे. 

हैदराबादेत रिसेप्शन.. 
- लग्नानंतर हैदराबादमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. 
- समांथा फॉर्मल सेरेमनीमध्ये डिझायनर क्रेशा बजाजने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करेल. 
- हनिमूनहून परतल्यानंतर समांथा समांथा शिवकार्तिकेयनच्या अनटायटल्ड चित्रपटाचे शुटिंग सुरू करणार आहे. 
- समांथा याचवर्षी 'राजू गरी गढी 2' मध्येही झळकणार आहे. यात ती सासरा नागार्जुनबरोबर काम करत आहेत. 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, नागा चैतन्य आणि समांथा रूथचा Wedding Album...
बातम्या आणखी आहेत...