आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

800 कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे हा साऊथस्टार, लव्ह लाईफमुळे नेहमी राहिला चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - साऊथ सुपरस्टार नागार्जून यांनी 29 ऑगस्ट रोजी वयाची 58 वर्षे पूर्ण केली आहेत. 29 ऑगस्ट 1959 रोजी जन्मलेल्या नागार्जून यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांतही काम केले आहे. नागार्जून यांनी 1986 साली 'विक्रम' चित्रपटातून डेब्यू केला होता. बॉलिवूडमध्ये त्यांचा  'शिवा' (1990)    हा पहिला सिनेमा होता. जवळपास 90 चित्रपटातून काम केलेल्या नागार्जून हे 800 कोटींचे मालक आहेत. लग्जरी लाईफस्टाईलमध्ये राहणाऱ्या नागार्जून यांच्याकडे मोठे कार कलेक्शन आहे. नागार्जून हे 40 कोटींच्या बंगल्यात राहतात. 
 
नागार्जून हे हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथे 40 कोटीचा बंगला आहे. ते अन्नपूर्णा स्टूडियो प्रोडक्शन कंपनीचे मालक आहेत. हा स्टुडिओ जवळपास 7 एकर परिसरात आहे. ते या प्रोडक्शन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.  याशिवाय ते अन्नपूर्णा इंटरनेशनल स्कूल ऑफ फिल्म एंड मीडिया, हैदराबाद चे प्रेसिडेंटही आहेत. ते NNN रियलिटी इंटरप्राइजेजचे फाउंडिंग पार्टनर आहेत. 
 
या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत होते अफेअर...
नागार्जूनचे बॉलिवूड अभिनेत्री तब्बुसोबत नाव जोडले गेले. नागार्जून यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता आणि दुसरे लग्न केले होते. त्यामुळे त्यांनी कधीही तब्बुशी लग्न नाही केले नाही.  
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, नागार्जून यांच्याबद्दल काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...