आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 दिवस हनीमूनसाठी जाणार नागार्जूनची सून, ऑक्टोबरमध्ये होणार विवाहबद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई/हैदराबाद - साऊथचा सुपरस्टार नागार्जून चैतन्यचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभु यावर्षी 6 ऑक्टोबर रोजी विवाहबद्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने होणार आहे. या लग्नाचा कार्यक्रम गोवामध्ये तीन दिवस चालणार आहे. यानंतर समांथा आणि नागा 40 दिवसांच्या हनीमूनवर जाणार आहेत. हा हनीमून दोन महिनेही चालु शकतो. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे दोघे घरी परततील. न्यूयॉर्कमध्ये घालवणार जास्त वेळ....

 - मिळालेल्या माहितीनुसार, समांथा आणि नागा दोघेही ट्रॅवलिंगचे शौकीन आहेत आणि लग्नानंतर फिरणे हा त्यांचा पहिला कार्यक्रम असणार आहे. 
 हे दोघे त्यांचा बहुतेक वेळ न्यूयॉर्कमध्ये घालवणार आहेत. येथेच समांथाच्या 'ये माया चेसावे' (2010) चित्रपटाचे शूटिंग झाले होते. 
 - हनीमूनवरुन परतल्यानंतर समांथा शिवकार्तिकेयन यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. 
 - समांथा यावर्षी 'राजू गरी गढ़ी 2' मध्येही दिसणार आहे. यात सासरे नागार्जूनही तिच्यासोबत काम करत आहेत. 2015 साली आलेल्या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. 
 
 पुढच्या स्लाईडवर वाचा, वीकेंडच्या दिवशी होणाऱ्या या लग्नाचे असे असेल शेड्यूल...
 
बातम्या आणखी आहेत...